शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्तीची गरज : खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:18 IST

गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही म्हणजेच कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मध्यंतरी संचालकांनीच बैठकीवर बहिष्कार घातला. आता याच कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याचसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...

ठळक मुद्देसारेच वादग्रस्त, एकही प्रकल्प निर्दोष नाही

गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही म्हणजेच कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मध्यंतरी संचालकांनीच बैठकीवर बहिष्कार घातला. आता याच कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याचसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोकप्रतिनिधीदेखील अंधारात असतील तर कंपनीचा काय उपयोग? असा प्रश्न करीत महापालिकेतील कॉँग्रेसचे गटनेते आणि स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे.प्रश्न : स्मार्ट सिटी कंपनी महापालिकेने स्थापन केली असताना ती बरखास्त करावी ही टोकाची भूमिका घेण्याचे कारण काय?खैरे : महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केल्यानंतर खरे तर सर्वच कामे वेगाने होण्याची गरज होती. परंतु कंपनीचा कारभार अत्यंत वादग्रस्त आहे. कंपनीच्या मार्फत शहरात जेवढी कामे घेण्यात आली त्यातील एक काम धड नाही. महाकवी कालिदास कलामंदिर असो अथवा कलादालन असो स्मार्ट रोडचे रेंगाळालेले काम आणि त्यातील उणिवा या सर्व बघतच आहात. आता त्या स्मार्ट पार्किंगचा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेला याबाबत माहिती नाही की नागरिकांना संचालक अंधारात असतात. शेवटी हे सर्व शहरासाठी असेल तर कोट्यवधी रुपये खर्च करून कामे योग्य पद्धतीने होत नसेल तर काय करणार?गावठाणचा विकास रखडलास्मार्ट सिटी कंपनीच्या आराखड्यात गावठाणचा समावेश करण्यात आला आहे. यात सर्व गावठाणाचा संबंध नाहीच, परंतु आज एक छोटी पाइपलाइन टाकण्याचे काम करायचे असेल तर स्मार्ट सिटीतून होणार असे सांगून कोणत्याही प्रकारची कामे केली जात नाही. गावठाणात मूलभूत सुविधांची कामेच ठप्प झाली आहेत.कंपनीच्या प्रशासकीय आणि आर्थिक विषयात मनमानी सुरू आहे. एका अधिकाऱ्याला दुप्पट पगार करण्यात आला आहे. सरकारात किंवा कोणत्याही कंपनीत इतक्या वेगाने इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही पगारवाढ झालेली नाही. अकौंटंट हा कंपनीत बसून काम करत असताना त्याला वाहन भत्ता लागू करण्यात आला. ११ महिन्यांच्या कराराने भरलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीcongressकाँग्रेस