शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

छोटे पक्ष, संघटनांची करावी लागते मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:25 IST

या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची

ठळक मुद्देभाव वधारला : लहान-सहान गोष्टींवरून राजी-नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी दोन किंवा तीन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार असली तरी, स्वत:ला पुरोगामी वा प्रतिगामी म्हणवून घेणाऱ्या अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व संघटनांनादेखील या निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्व प्राप्त झाले असून, निवडणूक तोंडावर असल्यामुळे असे पक्ष व संघटनांची समविचारी पक्षाला मनधरणी करावी लागत आहे. मेळावे, बैठकांना निमंत्रण देण्यापासून ते व्यासपीठावर मानाचे स्थान दिले नसल्याच्या निमित्ताने राजी-नाराजीला तोंड फुटत असल्याने मोठ्या पक्षांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची याबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी, त्यातूनच एकप्रकारे सेना-भाजपा वगळून कॉँग्रेस आघाडीला मतदान करा, असा संदेश अप्रत्यक्ष देण्यात आला आहे. या मोठ्या पक्षांबरोबरच जिल्ह्यात अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व त्यांना संलग्न संघटना आहेत. एरव्ही या पक्षांचे उपक्रम त्यांच्यापुरता मर्यादित असले तरी, निवडणुकीच्या निमित्ताने मात्र त्यांनी स्वत:च स्वत:चे महत्त्व तयार करून घेण्यास सुरुवात केली असून, प्रसिद्धीमाध्यमांकडे जाऊन किंवा संबंधित राजकीय पक्षांकडे जाऊन स्वत:हून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवित आहेत. त्यामागे निव्वळ ‘विश्वासात’ घेतले जावे एवढी अपेक्षा ठेवण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात राजकीय पक्षांनी मेळावे, बैठका बोलविताना राजकीय पक्ष, संघटनेचे नावे निमंत्रण द्यावे, फलकावर नेत्याचे छायाचित्र, मान्यवरांच्या यादीत नावे, व्यासपीठावर मानाचे पान, उपस्थिताना मार्गदर्शन करण्याची संधी दिली जावी, अशी भरमसाठ अपेक्षा ठेवली जात आहे. प्रचारासाठी साहित्य, वाहन, त्यासाठी येणारा खर्च व कार्यकर्त्यांचे खाणपानाची व्यवस्था भागविण्यासाठी उमेदवार व त्यांच्या राजकीय पक्षांकडे गळ घालण्यास सुरुवात झाली आहे. मुळातच यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, त्यासाठी प्रत्येक घटक, संघटनांच्या सहकार्याची गरज उमेदवारांना आहे, अशा वेळी त्यांना नाराज करणे परवडेनासे असले तरी, त्यांची राजी-नाराजी राखण्यातच दमछाक होऊ लागली आहे. अजून निवडणुकीला वेळ असली तरी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांचा भाव वधारण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक