शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चामरलेणी येथे वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:07 IST

चामरलेणी राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड्यांकडून सर्रासपणे घुसखोरी करत झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या वनक्षेत्रातील वृक्ष कापण्याचा सपाटा अज्ञात लोकांनी लावल्यामुळे वृक्षसंपदा धोक्यात आली आहे.

नाशिक : चामरलेणी राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड्यांकडून सर्रासपणे घुसखोरी करत झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या वनक्षेत्रातील वृक्ष कापण्याचा सपाटा अज्ञात लोकांनी लावल्यामुळे वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. राखीव वनक्षेत्र असूनदेखील या भागात सर्रास कुºहाड चालविली जात असून, वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे जागरूक नागरिकांनी सांगितले.चामरलेणी परिसर नैसर्गिक, धार्मिक स्थळ असून, या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा बहरलेली आहे. पावसामुळे या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. यामुळे या भागात मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करू लागले आहे. तसेच सकाळ-संध्याकाळच्या सुमारास या भागातील रहिवासी फेरफटका मारण्यासाठी या परिसराला पसंती देतात. मात्र मागील काही दिवसांपासून या भागात वृक्षांवर काही लाकूडतोड्यांकडून घाव घातला जात आहे. पंधरवड्यापासून या भागात वृक्ष कापणारी टोळी सक्रिय झाली असून, अद्याप २० ते २५ झाडांवर अज्ञात संशयितांकडून कुºहाड चालविली जात आहे. याकडे वनविभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा या भागातील वृक्षराजी संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. चामरलेणी परिसराचा फेरफटका मारला तर या भागात राखीव वनक्षेत्रात ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, गुलमोहर यांसारख्या प्रजातींची झाडे अधिक आढळून येतात. या भागात भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करणे गरजेचे आहे.राखीव वनक्षेत्राला नुकसान पोहचविणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. तरीदेखील या भागात सकाळी तसेच दुपारी किंवा सायंकाळी सर्रासपणे घुसखोरी करत झाडे कापली जात आहेत. एकीकडे वृक्षाच्छादित क्षेत्रवाढीसाठी ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम वनमहोत्सवांतर्गत शासनाकडून राबविला जात असून, दुसरीकडे वाढलेल्या झाडांच्या संवर्धनाबाबत मात्र प्रशासनाला अपयश येत असल्याने जनसामान्यांमध्ये वेगळाच संदेश जात आहे. वनविभाग नाशिक पश्चिमकडून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत  आहे.चामरलेणीचा संपूर्ण परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात कुठल्याही प्रकारे नुकसान पोहचविणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. वृक्षतोडीसारखा गंभीर प्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार असून, या भागावर वनविभागाच्या गस्ती पथकाचे लक्ष आहे. वृक्षतोड करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.- रवींद्र भोगे, वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग