सरपंच तुंगार यांनी अतिशय मेहनतीने तीन वर्षांपासून इस्रायल पद्धतीने आंबा लागवड बाग तयार केली होती. परंतु अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास बागेत कुणीही नसल्याचा फायदा घेत शेकडो झाडांची बुंध्याला कत्तल करून बाग भुईसपाट केली आहे. त्यामुळे सरपंच प्रवीण तुंगार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कत्तल केलेल्या बागेला आमदार हिरामण खोसकर यांनी भेट देऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे.
कोट...
रात्री अज्ञातांनी माझ्या आंबाबागेतील ३५० पेक्षा जास्त आंबा झाडांची कत्तल केली असून मोठे नुकसान केले आहे. तोडणाऱ्या व्यक्तींचा शोध होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व मला नुकसानभरपाई मिळावी.
- प्रवीण तुंगार (सरपंच निरगुडे)
170921\1933-img-20210917-wa0028.jpg
बागेची पाहणी करताना आमदार हिरामण खोसकर