शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नाशकात रुजतेय  ‘त्वचादान’ चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:37 IST

राज्यातील जळीताच्या घटनांचे प्रमाण आणि त्यात मयत झालेल्यांची संख्या पाहता ६० ते ७० टक्के भाजलेल्या रुग्णांचा मृत्यू होतो. अशा रुग्णांना त्वचा मिळाल्यास त्यांचेदेखील प्राण वाचू शकतात, यासाठी नाशिकमध्ये त्वचादानाबाबत सुरू झालेल्या चळवळीत सहभागी होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.

नाशिक : राज्यातील जळीताच्या घटनांचे प्रमाण आणि त्यात मयत झालेल्यांची संख्या पाहता ६० ते ७० टक्के भाजलेल्या रुग्णांचा मृत्यू होतो. अशा रुग्णांना त्वचा मिळाल्यास त्यांचेदेखील प्राण वाचू शकतात, यासाठी नाशिकमध्ये त्वचादानाबाबत सुरू झालेल्या चळवळीत सहभागी होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.  नाशकातील त्वचा बॅँकेला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला असून, दोन वर्षांच्या परिश्रमानंतर लोक त्वचादानाबाबत सकारात्मक झाले असल्याचे चित्र आहे. अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वसामान्यांसाठी न परवडणारी बाब आहे. आज बहुतेक जण एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव जाळून वा पुरून टाकतात; मात्र अशा मृत व्यक्तीचे अवयव आणि त्वचा वेळीच संकलित केल्यास अनेकांना जीवदान मिळू शकते. समाजात प्रचार, प्रसार करून जनजागृती करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार देण्याची आवश्यकता आहे.  यासाठी अवयवदानाबरोबरच त्वचादान हीसुद्धा एक चळवळ रुजविण्यासाठी नाशिकचे डॉ. राजेंद्र नेहते प्रयत्न करीत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या स्कीन बॅँकेला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.  नाशिक शहराचा विचार केला तरी, दरवर्षी साधारणपणे पाचशे त्वचादात्यांची गरज भासते. मात्र, सद्यस्थितीत महिन्यात एका व्यक्तीचे त्वचादान मिळणे दुरापास्त झाले आहे. त्वचादान केल्याने अनेकांना जीवनदान मिळू शकते. यामुळे पुढील काळात जास्तीत जास्त नाशिककरांनी जागृत होऊन त्वचादान मोहिमेत सहभागी होण्याची आवश्यकता आहे. रोटरी क्लब आणि वेदांत हॉस्पिटलच्या सहकार्याने देशातील आठवी आणि महाराष्ट्रातील पाचवी स्किन बँक नाशिकमध्ये कार्यरत आहे.  भारतात दरवर्षी जवळपास ७० लाख जळण्याच्या घटनांची नोंद होते. पैकी दीड लाख लोक मृत्यू पावतात. यात ७० टक्के जळण्याचे प्रमाण १५ ते ३५ वयोगटातील लोकांचे असतात. रु ग्णालयात उपचार घेणाºया ८० टक्के लोकांत सर्वाधिक प्रमाण स्वयंपाकघरात काम करणाºया महिलांचे असून, त्यात ५ पैकी ४ लहान मुलांचा समावेश असतो ही अतिशय गंभीर बाब आहे.नाशिकमध्ये या मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांना सामावून घेण्यासाठीची मोहीम आता सुरू झाली आहे. दर महिन्यात यासाठी ठिकठिकाणी व्याख्यान आणि जागृती मेळावे आयोजित केले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये अवयव दानाची जागरूकता होत आहे. त्यांनी आता त्वचादानाकडेदेखील वळले पाहिजे यासाठी स्कीन बॅँकेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. याबरोबरच महाविद्यालयीन तरुणांमध्येदेखील जागरूकता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून ते आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना या प्रवाहात आणतील आणि स्वत:ही या मोहिमेचा भाग बनतील यासाठीची मोठी चळवळ उभी राहिली आहे. याचा परिणाम म्हणून आत्तापर्यंत १९ त्वचा दाते मिळाले असून, त्यामुळे तीन जळीत रुग्णांचे प्राण वाचू शकले आहेत. तर आजवर १७५ जणांनी त्वचादान करण्याचे अर्ज भरून दिले आहेत.भारतातील पहिली स्कीन बॅँक ही मुंबईत नॅशनल बर्न सेंटर येथे सुरू झाली. नाशिकमध्ये रोटरी क्लब आणि वेदांत हॉस्पिटलच्या सहकार्याने स्कीन बॅँक सुरू करण्यात आली आहे. या बॅँकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये स्कीन डोनेट आणि रुग्णांवरील उचारासाठी प्रयत्न केले जात आहेत. मृत्यूनंतरच्या सहा तासातील त्वचा इतरांना उपयुक्त ठरते. यामुळे जळीत पेशंटचे प्राण वाचू शकतात. ही त्वचा पाच वर्ष प्रिझर्व्ह करता येते. त्वचा केवळ मांडी, पाय आणि पाठीच्या काही भागाची घेतली जाते. स्कीन ही पूर्णपणे नव्हे तर त्वचेवरील सर्वात पहिला पापुद्रा काढला जातो. त्यामुळे मृतदेहाचे कोणतेही विद्रुपीकरण होत नाही. नाशिकमध्ये आता ही चळवळ वाढविण्याची गरज असून डॉक्टर्स, रुग्ण आणि नागरिकांमध्ये व्यापक सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे.- डॉ. राजेंद्र नेहते,  संचालक, स्कीन बॅँक

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल