शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

वंचित घटकांसाठी कृतिशील शिक्षकांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:03 IST

शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. वंचितांच्या शैक्षणिक विकासासाठी कृतिशील शिक्षक कार्य करत असल्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सदैव सहकार्य करेल, असे आवाहन कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.

पेठ : शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. वंचितांच्या शैक्षणिक विकासासाठी कृतिशील शिक्षक कार्य करत असल्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सदैव सहकार्य करेल, असे आवाहन कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.  राज्यातील कृतिशील शिक्षक महाराष्ट्रच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात दोनदिवसीय राज्यस्तरीय शिक्षण संमेलन संपन्न झाले. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.समन्वयक विक्रम अडसूळ यांनी परिचय करून दिला. सहसमन्वयक ज्ञानदेव नवसारे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ व्याख्याता डॉ. कविता साळुंके, ज्योती बेलवले यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी सीसीआरटी नवी दिल्लीचे समुपदेशक डॉ. हितेश पानेरी यांचे समुपदेशन संपन्न झाले. संदीप पवार, लहू बोराटे, सचिन सूर्यवंशी, किरण गायकवाड, संदीप शेजवळ यांनी उपक्रमशील शाळा या विषयावर प्रकाशझोत टाकला. विशेष शिक्षक सुरेश धारराव, सोपान खैरनार, राहुल भोसले यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवास सादर केला. बाळासाहेब लिंबकाई यांनी मुलांसाठी पुस्तकांचे प्रकट वाचन का व कशासाठी? या विषयावर मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल सादरीकरण केले. कवींनी कविता सादर केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुण सादर करण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशाची सुरुवात वॉक विथ चॅन्सलने (कुलगुरु) झाली. प्रथम सत्रात मॅक्सीन बर्नसन ऊर्फ मॅक्सीन माउशी यांनी सक्षम मनुष्य घडवण्यासाठी मातृभाषेचे स्थान या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा वेगळा प्रवास वेच्या गावित, जगदीश कुडे, प्रदीप देवरे, तुकाराम अडसूळ, लक्ष्मीकांत इडलवार, सारिका बदादे, वाल्मीक चव्हाण, पूजा पाटील यांनी सादर केला. याप्रसंगी विभागीय माहिती उपसंचालक किरण मोघे, एल.एन. सोनवणे, पेठचे तहसीलदार हरीश भामरे, विशाल तायडे, सरोज जगताप, किरण कुवर, विक्र म अडसूळ, डॉ. विजय पाईकराव, नारायण मंगलाराम, ज्योती बेलवले, ज्ञानदेव नवसारे आदी सहभागी झाले आहेत. जयदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.शैक्षणिक  ज्ञानमहाराष्ट्रातील विविध शैक्षणिक उपक्र मांची खाण असलेल्या शिक्षकांना एकत्रित करून त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग इतर शिक्षकांना व्हावा यासाठी आयोजित केलेल्या दोनदिवसीय संमेलनात राज्यभरातून आलेल्या शिक्षकांना बौद्धिक मेजवानी मिळाली. शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांनी सादरीकरण केले. शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात  आले. कृतिशील शिक्षक राज्यातील शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक ठरणार आहे, असे विक्रम अडसूळ यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकYashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ