शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

‘त्या’ नशेबाज टोळीतील सहा संशयितांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:54 IST

वाढदिवसानिमित्त दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये पार्टीच्या वेळी नशेच्या धुंदीत झिंगलेल्या दहा ते पंधरा संशयित गुंडांनी मिळून साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना लक्ष्य करत अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा संशयितांना अटक केली आहे.

ठळक मुद्देफार्महाउस मारहाण , दंगल, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

नाशिक : वाढदिवसानिमित्त दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये पार्टीच्या वेळी नशेच्या धुंदीत झिंगलेल्या दहा ते पंधरा संशयित गुंडांनी मिळून साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना लक्ष्य करत अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा संशयितांना अटक केली आहे.फार्महाउसमध्ये पंचवटीतील एका ‘बॉस’च्या वाढदिवसानिमित्त ओली पार्टी रंगविताना गुरुवारी (दि.९) संध्याकाळपासून पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यधुंद अवस्थेत धिंंगाणा घातला गेला; मात्र याचा कुठलाही मागमूस रात्रपाळीच्या गस्तीवर असणाºया तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला लागला नाही, हे विशेष!पार्टीच्या वेळी दारूसह अन्यप्रकारच्या प्रतिबंधित अशा अमली पदार्थांच्या नशेत झिंगलेल्या टोळीने साउंडसिस्टिम वाजविणाºया 

दोघा तरुणांना टार्गेट करत ‘साउंडची क्वॉलिटी दिली नाही, बॉसला नाराज केले’ असे सांगून कुरापत काढली. कमरेच्या पट्टय़ासह मिळेल त्या वस्तूने दोघांना अमानुष मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. एवढय़ावरच गुंडांची ही टोळी थांबली नाही, तर त्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून धमकावत अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले आणि लैंगिक अत्याचारदेखील दोघांवर केले. यावेळी काहींनी पिस्तूलमधून हवेत गोळीबारदेखील केल्याचे पीडित युवकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. हा प्रकार सोशलमीडियातून शुक्रवारी सर्वप्रथम समोर आल्यानंतर ग्रामीण पोलीस खडबडून जागे झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य संशयित सराईत गुन्हेगार संदेश काजळे, प्रितेश काजळेसह अन्य दहा ते बारा संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह पुरुषांसोबत अनैसर्गिक अत्याचार व दंगल माजविल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास अधिक्षक आरती सिंह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणो यांच्याकडे सोपविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सहा संशयितांना शनिवारी संध्याकाळी उशिरार्पयत ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.  मुख्य संशयित संदेश काजळे हा अद्याप फरार असून, त्याच्या मागावर पथके रवाना केल्याचे अधीक्षक सिंह यांनी सांगितले. आरोपी राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.दरम्यान, पोलिसांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करत संशयित हल्लेखोरांनी जातीयवाचक शिवीगाळ केल्याचेही पीडित युवकाने सांगितले आहे, त्याआधारे तत्काळ त्यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, तसेच मोक्काची कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून अध्यक्ष संतोष सोनपसारे आदींनी निवेदनाद्वारे अधीक्षकांकडे केली आहे.

फार्महाउसची झाडाझडतीदरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसची स्थानिक गुन्हे शाखा, तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणो यांच्या उपस्थितीत झाडाझडती घेतली. फार्महाउसमधील धिंगाण्याचे विविध पुरावे यावेळी पोलिसांच्या पथकाने शनिवारी सकाळी गोळा केले. वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली धिंगाणा घालणारी हल्लेखोरांची टोळी फरार झाली, मात्र त्यापैकी सहा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी