शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सहा संशयितांना आठ दिवस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:47 IST

जेलरोड चंपानगरी येथे युवकांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या सुभाषरोड येथील युवक रोहित प्रमोद वाघ याच्या निर्घृण खून प्रकरणी अटक केलेल्या संशयित सहा आरोपींना नाशिकरोड न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

नाशिकरोड : जेलरोड चंपानगरी येथे युवकांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या सुभाषरोड येथील युवक रोहित प्रमोद वाघ याच्या निर्घृण खून प्रकरणी अटक केलेल्या संशयित सहा आरोपींना नाशिकरोड न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आणखी एक अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जेलरोड मंगलमूर्तीनगर येथील चंपानगरी येथे रविवारी रात्री खुनाची घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या घटनेनंतर उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासचक्र फिरवून सोमवारी सहा संशयितांना अटक केली होती, तर एका अल्पवयीन संशयितालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित अमित गौतम वाघमारे (२७), बाळा सुरेश केदारे (१९) रा. त्रिभुवन सोसायटी, ललित प्रवीण वाघले (१९) रा. निसर्ग गोविंद सोसायटी, सागर बाळू गांगुर्डे (१८) रा. चंद्रवन सोसायटी, विशाल झुलाल जाधव (२०) रा. हरिनिवास बंगलो, समाधान सुरेश आव्हाड (१८) रा. चंद्रलिला हौसिंग सोसायटी, मंगलमूर्तीनगर जेलरोड या सहा जणांना मंगळवारी दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता बुधवार  (६ फेब्रुवारी) आठ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित फरारी संशयितांचा पोलीस कसून शोध घेत आहे.न्यायालयात मोठा बंदोबस्तखुनाच्या गुन्ह्यातील अटक केलेल्या संशयित आरोपींना नाशिकरोड न्यायालयात मंगळवारी दुपारी आणण्यात येणार असल्यामुळे युवकांची मोठी गर्दी झाली होती. सुरक्षितेच्या कारणास्तव न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काळे बुरखे घालून आणलेल्या संशयितांना न्यायालयीन कामकाज आटोपताच पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी