नाशिक : जिल्हा कृषी औद्योगिक संघाच्या पंचवार्षिक मंगळवारी (दि.२२) ३८ (२) संवर्गातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने या संवर्गातील पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात जि. प. सदस्य अॅड. संदीप गुळवे, भास्करराव बनकर, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब जाधव व निवृत्ती महाले या पाच जणांचा समावेश आहे.येत्या २४ तारखेपर्यंत जिल्हा कृषी औद्योगिक संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम माघारीची मुदत आहे. यापूर्वीच विद्यमान अध्यक्ष चांगदेवराव होळकर हे वैयक्तिक गटातून एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवडूून आले आहेत.जिल्हा कृषी औद्योगिक संघाच्या निवडणुकीत दोन पॅनल होण्याची शक्यता आहे. त्यात ३८(२) या संवर्गात एकूण पाच जागांसाठी सात उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते. त्यात विजय सोमनाथ मोरे व के.पी. आव्हाड या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने या संवर्गात पाच उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने अॅड.संदीप गुळवे, राजेंद्र डोखळे, भास्करराव बनकर, बाळासाहेब जाधव व निवृत्ती महाले हे बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या अधिकृत नावांची घोषणा निवडणुकीनंतर होईल. महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी विद्यमान संचालक पुष्पाताई हिरे यांनी फॉर्म भरलेला नसला तरी अन्य संचालक विमल घोटेकर यांच्यासह जिल्हा बॅँक संचालक डॉ. शोभा बच्छाव, उषाताई शिंदे व साधना जाधव असे चार उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. तसेच इतर मागास प्रवर्गातून जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांचे पती रत्नाकर चुंभळे यांच्यासह आमदार अपूर्व हिरे व सुनील आडके असे तिघांचे अर्ज शिल्लक राहिल्याचे समजते. तसेच ३८ (१) या संवर्गातून अद्वय हिरे यांच्यासह रत्नाकर चुंभळे, माजी आमदार अनिल अहेर,तांबे असे चार अर्ज शिल्लक असल्याचे कळते. त्याचप्रमाणे ३८(३) संवर्गातून प्रकाश कवडे, तुकाराम पेखळे, के. पी. आव्हाड, सोमनाथ मोरे, दिलीप मोरे, संदीप पानगव्हाणे यांचे उमेदवारी अर्ज असल्याचे समजते. २४ तारखेपर्यंत माघारीची अंतीम मुदत असून २५ तारखेला अंतिम यादी प्रकाशित करण्यात येऊन उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात येणार आहे. येत्या ११ आॅक्टोबरला या निवडणुकीचे मतदान होणार असून १३ आॅक्टोबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीत काही गटातून दोनपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज शिल्लक असल्याने निवडणुकीत दोन पॅनल होऊन सरळ सरळ दुरंगी लढतीची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
सहा जागा बिनविरोध
By admin | Updated: September 22, 2015 23:51 IST