शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात सहा जणांना अतिसाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:05 IST

सुरगाणा येथे दूषित पाण्यामुळे पुन्हा एकदा अतिसाराची साथ उद्भवली असून, सहा रुग्णांना लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी येथे अतिसाराने तिघांना जीव गमवावा लागला होता.

नाशिक : सुरगाणा येथे दूषित पाण्यामुळे पुन्हा एकदा अतिसाराची साथ उद्भवली असून, सहा रुग्णांना लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी येथे अतिसाराने तिघांना जीव गमवावा लागला होता.दूषित पाण्यामुळे अतिसाराचा उद्रेक होऊन सहा जणांना लागण झाल्याने सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत अंबोडा, झगडेपाडा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या सूचनेनुसार त्वरित पाणी व स्वच्छता कक्षातील चमूने व अंबोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी पथकाने भेट देऊन याबाबत माहिती घेतली.सुरगाणा तालुक्यातील झगडेपाडा येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी दूषित होऊन अतिसाराची लागण झाली होती. याबाबत डॉ. गिते यांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानुसार पाणी व स्वच्छता कक्षातील चमूने व अंबोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी पथकाने पाणी शुद्धीकरणाचा आढावा घेत सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याबाबत सूचना दिल्या.यावेळी विहिरीची पाहणी करण्यात आली. अंबोडा येथील ग्रामीण रुग्णालय बाºहे येथे भेट दिली असता असलेले आंतररुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत एकही गंभीर रुग्ण नसल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.ग्रामपंचायत अंबोडा, झगडेपाडा येथील ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येऊन त्यांना सद्यस्थितीत विहिरीचे पाणी पिण्यास न वापरण्याबाबत, परंतु पाड्यावरील उपलब्ध हातपंपाचे पाणी पिण्यास, वापरण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्यात जीवन ड्रॉपचा वापर करण्याबाबत तसेच पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांनी सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी व पथक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, उपपाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक