शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वालदेवी धरणात सहा जण बुडाले, एका मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 01:54 IST

नाशिक : एकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरणावर गेलेल्या शहरातील सिंहस्थनगर, मोरवाडी, सिडको परिसरातील ९ जणांपैकी ६ जण पाण्यात ...

ठळक मुद्देतिघे बचावले : बचाव पथकाकडून अन्य पाच जणांचा शोध सुरू

नाशिक : एकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरणावर गेलेल्या शहरातील सिंहस्थनगर, मोरवाडी, सिडको परिसरातील ९ जणांपैकी ६ जण पाण्यात बुडाल्याची दुदैवी व धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यातील एका मुलीचा मृतदेह हाती लागला असून, अन्य पाच जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेत सुदैवाने तिघे बचावले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सिंहस्थनगर, मोरवाडी, वंजारभवन, पाथर्डीफाटा परिसरातील हिंमत चौधरी (१६), समाधान वाकळे,  प्रदीप जाधव, सना वजीर मणीयार (१६) आरती भालेराव (२२),  नाजीया वजीर मणीयार (१९), खुशी वजीर मणीयार (१०),  ज्योती गमे (१६) व सोनी गमे (१२)  हे सर्व १० ते २२ वयोगटांतील मुले-मुली सोनी गमे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरण परिसरात शुक्रवारी दुपारी गेले होते. त्यांनी सोबत केकही नेला होता. यावेळी से‌ल्फी काढण्याच्या नादात एकाचा पाय घसरल्याने पाण्यात पडला मात्र, त्यातील आरती भालेराव, हिंमत चौधरी, नाजीया मणीयार, खुशी मणीयार, ज्योती गमे व सोनी गमे हे सहा जण पाण्याचा अंदाज  न आल्याने बुडाले, तर समाधान वाकळे व  प्रदीप जाधव रा.सिंहस्थनगर, सेंट लॉरेन्स शाळेजवळ आणि सना नजीर मणीयार रा. टोयाटो शोरूममागे, पाथर्डीफाटा हे तिघे जण सुदैवाने बचावले. या घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. यावेळी पाण्यातून आरती भालेराव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात  आला, तर अन्य पाच जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. याच वेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बचाव कार्यात स्वत: पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांचेसह पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील व सहकारी कर्मचारी सोनवणे, नवले, मराठे, चौधरी सहभागी झाले आहेत. सेल्फीने केला घातधरणांतील पाण्याजवळ सेल्फी काढण्याचा धोका जीवावर बेतण्याची घटना घडली आहे. ज्या मुलीचा वाढदिवस होता, ती सोनी गमे हीही पाण्यात बुडाली असून, तिच्यासोबत तिची बहीण ज्योती गमे हीही आहे. याशिवाय मणीयार कुटुंबातील दोघी बहिणींचा समावेश आहे. दरम्यान, रात्रीच्या अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते. रात्री उशिराने आरसीपी पथकालाही पाचारण करण्यात आले होते.वाढदिवस बेतला जिवावरकोरोनामुळे सर्वत्र हॉटेल, तसेच अन्य ठिकाणे बंद असल्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट वालदेवी नदीवर गेलेल्या मित्र- मैत्रिणींच्या वाढदिवस जिवावर बेतला. यात हिंमत चौधरी हा एकुलता एक मुलगा बेपत्ता झाला असून, त्याचादेखील शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने  सिंहस्थनगर परिसरात  शोककळा पसरली होती. दरम्यान, रिक्षाचालकामुळे नऊ जणांपैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, अंधारात शोधकार्यात अडथळे येत असल्याने रात्री उशिरा शोधकार्य थांबविण्यात आले. शनिवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू