नाशिक : बेळगाव ढगा शिवारातील एक एकर शेतजमिनीचा व्यवहार करून त्यापोटी सहा लाख रुपये घेतल्यानंतर जमिनीची खरेदी न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नीता देठे (गंगापूररोड) यांच्यासोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन संशयित नेहा कुलकर्णी (रा़ कृषिनगर) यांनी बेळगाव ढगा शिवारातील एक एकर शेतजमिनीचे १२ मे २०१४ रोजी साठेखत केले़ त्यापोटी सहा लाख आरटीजीएसद्वारे घेतले़ मात्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही या जमिनीची खरेदी करून न देता फसवणूक केली.
शेतजमीन व्यवहारातून सहा लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:39 IST