शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रचाराला शिल्लक अवघे सहा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 19:04 IST

विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदरपासून प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मतदारसंघाचा राजकीय व सामाजिक अभ्यास करण्याबरोबरच, ठिकठिकाणच्या समर्थक, हितचिंतकांचे मेळावे, बैठका घेऊन निवडणुकीला कल जाणून घेतला असला तरी, प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय

ठळक मुद्देउमेदवारांची दमछाक : मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपडसुरुवातीचे चार दिवस तर उमेदवारांचे विविध भागांमध्ये संपर्क कार्यालये उघडण्यात गेले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणे शक्य नसल्याचे पाहून उमेदवारांनी कार्यकर्त्यांकरवी मतदारांपर्यंत आपले प्रचारसाहित्य पुरविण्यावर भर दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदरपासून प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मतदारसंघाचा राजकीय व सामाजिक अभ्यास करण्याबरोबरच, ठिकठिकाणच्या समर्थक, हितचिंतकांचे मेळावे, बैठका घेऊन निवडणुकीला कल जाणून घेतला असला तरी, प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी वाटपावरून साठमारी सुरू असल्यामुळे जोपर्यंत पक्षाची अधिकृत उमेदवारी हातात पडत नाही, तोपर्यंत उमेदवारीबाबत निश्चितता नव्हती. पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर छाननी व माघारीपर्यंत सर्वच उमेदवारांचा जीव टांगणीला लागून होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या खºया प्रचाराला ७ आॅक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीचे चार दिवस तर उमेदवारांचे विविध भागांमध्ये संपर्क कार्यालये उघडण्यात व कार्यकर्त्यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात गेले. त्यानंतर मात्र मतदारसंघात नेत्यांच्या प्रचारसभांच्या आयोजनात उमेदवारांचा वेळ खर्ची पडला. निवडणुकीचा प्रचार सुरू होवून सात दिवस उलटले असून, पहिल्या टप्प्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉँग्रेसने बºयापैकी आघाडी घेतली आहे. त्यांच्या त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रामदास आठवले, छगन भुजबळ, डॉ. अमोल कोल्हे यांचे जिल्ह्यात दौरेही झाले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शरद पवार, राज ठाकरे आदींच्या सभा घेण्याचे घाटत आहे. जिल्ह्यात कॉँग्रेस सहा जागांवर निवडणूक लढवित असली तरी अद्याप एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा वा बैठक एकाही मतदारसंघात होऊ शकलेली नाही.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांचा कालावधी मिळणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमावरून दिसत असले तरी, २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने मतदानाच्या ४८ तास अगोदर जाहीर प्रचाराला निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. त्यामुळे शनिवार, दि. १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर उमेदवारांना नाईलाजाने प्रचार आटोपता घ्यावा लागणार आहे. परिणामी हाती असलेल्या सहा दिवसांत उमेदवारांना मतदारसंघाच्या कानाकोपºयात पोहोचण्यासाठी उमेदवारांना धडपड करावी लागणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनाही जुंपण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य नसल्याने उमेदवारांचे नातेवाईक व कुटुंबीयांवर काही भागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक