शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याहून येणाऱ्या नाशिककरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:33 IST

पुणे येथून नाशिककडे निघालेल्या शिवशाहीतील प्रवाशांचे मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे हाल झाले. तीन शिवशाहीतील प्रवाशांना काही काळ चाकण येथे एका रुग्णालयाच्या दालनात दिवसभर ठेवण्यात आले.

नाशिक : पुणे येथून नाशिककडे निघालेल्या शिवशाहीतील प्रवाशांचे मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे हाल झाले. तीन शिवशाहीतील प्रवाशांना काही काळ चाकण येथे एका रुग्णालयाच्या दालनात दिवसभर ठेवण्यात आले. सायंकाळी स्थानिक आमदारांच्या मदतीने पुन्हा पुणे येथे पाठविण्यात आले तर नाशिककडून पुण्याला जाणा-या प्रवाशांना वाहने माघारी फिरवावी लागली.  नाशिक-मुंबईप्रमाणेच नाशिक आणि पुणे मार्गावरून रोज शेकडो नागरिक कामानिमित्त ये-जा करीत असतात. मराठा आंदोलकांनी सोमवारी (दि.३०) चाकण परिसरात मोठे आंदोेलन केले. अनेक मोटारी फोडण्यात आल्यामुळे पोलिसांना संचारबंदी करावी लागली. सकाळी शिवाजीनगरहून निघालेल्या तीन शिवशाही बस चाकणपर्यंत आल्या. परंतु आंदोलनामुळे त्या फसल्या. आंदोलकांनी आंदोलने करताना शिवशाहीला मात्र वगळले असल्याने त्यांना दिलासा मिळाला. परंतु कोेंडीत अडकल्याने त्यांना काहीच करता येत नव्हते. यावेळी परिवहन महामंडळाच्या स्थानिक अधिकारी व चालकाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या खाडे हॉस्पिटलच्या हॉलमध्ये सुरक्षित ठेवले. दरम्यान, नाशिकमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे व त्यांच्या सहकाºयांनी चाकण येथील मराठा कार्यकर्त्यांना कळविल्यानंतर त्यांनी मदत देण्याचा प्रयत्न केला. परंतु संचारबंदीमुळे कार्यकर्ते तेथे पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी संपर्क साधून बस सुरक्षीतरीत्या तेथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.  दरम्यान, चाकण येथील स्थानिक शिवसेना आमदार सुरेश गोºहे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रवाशांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवशाही परत माघारी शिवाजीनगरपर्यंत नेण्यात आल्या आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ