शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, तुम्ही कारखाना उभा कराच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 00:06 IST

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आर्जव : इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना सुरू करण्यासाठी महसूलमंत्र्यांना साकडे

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.इगतपुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संगमनेर येथे महसूलमंत्री थोरात यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकरी तेथील भौगोलिक परिस्थिती चांगली असताना देखील इगतपुरी, त्रंबक येथील शेतकऱ्यांना भातशेतीवर अवलंबून राहावे लागते. भाताला गेल्या पाच वर्षांपासून शाश्वत भाव नाही, ऊस उत्पादनात हा तालुका अग्रेसर असून सन २०२० मध्ये इगतपुरीचे व नाशिकचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात लागवडीखाली होते. परंतु हक्काचा कारखाना नसल्याने इतर ठिकाणी ऊस नोंद करण्यासाठी व पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हक्काचा कारखाना नाही. इगतपुरी तालुक्याला संगमनेरसारखे तुम्हीच उभे करू शकता, अशी भावनिक हाक थोरात यांना इगतपुरीतील शेतकऱ्यांनी आमदार सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत घातली.इगतपुरी तालुक्यात सात ते आठ धरणे असून या धरणांमुळे तालुक्यातील व इतर तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे तर ते म्हणजे फक्त ऊस, तुम्ही जर इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना खासगी तत्त्वावर उभा केला तर नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्रंबक तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतील. याप्रसंगी बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी गोरख भाऊ मराडे, सुनीलभाऊ वाजे, सुदाम भोसले, ज्ञानेश्वर जमदाडे, रामदास भोसले, निवृत्ती वाकचौरे, रमेश भोसले, समाधान शेलार, रमेश बेंडकोळी, सुनील गाढवे आदी शेतकरी सहभागी झाले होते.इगतपुरी तालुक्यातील धरणामुळे इतर तालुक्यांत देखील मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होऊ शकेल. हक्काचा नासाका असताना दोन हजार हेक्‍टर क्षेत्र ऊस लागवड केलेले होते. त्यात एकट्या इगतपुरी तालुक्यात हजार ते अकराशे हेक्टर, नाशिक तालुका सातशे ते आठशे हेक्टर, सिन्नर दोनशे ते अडीचशे व त्रंबक शंभर ते दीडशे क्षेत्रात लागवड होत होती. परंतु आज जर संगमनेरच्या धर्तीवर साखर कारखाना उभा राहिला तर या चारही तालुक्यांत मिळून चार हजार हेक्‍टरच्या आसपास ऊस लागवड होईल, अशी माहिती यावेळी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने