जळगाव नेऊर : साहेब, पिके निघाल्यावर वीज बिल भरू, असे साकडे साताळी येथील शेतकऱ्यांनी बंद रोहित्र सुरू करण्यासाठी महावितरणला घातले आहे.
साताळी व परिसरात दुष्काळी परिस्थिती असून शेती व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. शेतकरी वर्गासमोर विजेअभावी चिंता उभी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीत जेमतेम थोडेफार पाणी असून विजेअभावी सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठी अडचण तयार झालेली असून उभी असलेली पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असून पिके निघाल्यावर थोड्याफार प्रमाणात वीज बिले भरू, तरी साताळी व परिसरातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून महावितरणने साताळी व परिसरातील सर्व बंद रोहित्रांचा विद्युत प्रवाह सुरळीत करावा, या मागणीसाठी साताळी येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. निवेदनावर सरपंच सेवा महासंघाचे राज्य सोशल मीडिया अध्यक्ष तथा माजी सरपंच भाऊसाहेब कळसकर, दत्ताजी सुखदेव काळे, अभिमन्यू आहेर, सुरेश शांताराम सोनवणे, बाळू काशिनाथ काळे, पोपट बाबूराव अभिमन्यू आहेर, शरद यशवंत राजगुरू, बाळू पंजा काळे, दत्तू जगन्नाथ काळे, धोंडीराम काळे, मनोहर काळे आदींच्या सह्या आहेत.
-----------------------
वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पाटील यांना निवेदन देताना सरपंच सेवा संघाचे भाऊसाहेब कळसकर, दत्ताजी काळे, अभिमन्यू आहेर, सुरेश सोनवणे व शेतकरी. (१४ जळगाव नेऊर २)
140821\14nsk_13_14082021_13.jpg
१४ जळगाव नेऊर २