शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरफाटा पादचारी पूल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:19 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानक फ्लॅट फॉर्म दोन-तीनवरून देवी चौक-सिन्नरफाटा जुना रेल्वे पादचारी पुलावर जाण्या-येण्याचा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानक फ्लॅट फॉर्म दोन-तीनवरून देवी चौक-सिन्नरफाटा जुना रेल्वे पादचारी पुलावर जाण्या-येण्याचा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सुरक्षितेचे कारण सांगत भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता कुठलीही पूर्वसूचना व बंद मार्गाबाबत माहितीफलक न लावल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.नाशिकरोडची काही वर्षांपूर्वी सिन्नरफाटा भागात मोठी बाजारपेठ होती. देवी चौकातील बाजारपेठेतून सिन्नरफाटा येथे जाण्या-येण्यासाठी रेल्वे पादचारी पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता व सध्याच्या परिस्थितीत होतदेखील आहे. सिन्नरफाटा भागातील रहिवासी, विद्यार्थी, कामगार, महिला, प्रवासी नित्याने देवी चौकातील रेल्वे पादचारी पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कुंभमेळ्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानकात येण्या-जाण्यासाठी विविध ठिकाणी मार्ग तयार करण्यात आले. त्यामध्ये देवीचौक जुन्या पादचारी पुलास फ्लॅट फॉर्म दोन-तीनवर जाण्या-येण्यासाठी पायऱ्याचा मार्ग बनविण्यात आला.यामुळे देवी चौकात पादचारी पुलाखाली पार्किंग करणाºया व नाशिकरोडला शिवाजी पुतळा देवीचौक मार्गे येणाºया रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होत होती. त्यामुळे रेल्वेस्थानकांच्या मुख्य प्रवेशद्वारावरील प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी होत होता.ठराविक रेल्वे प्रवाशांकडून वापरदेवीचौकातील पादचारी पुलावरून रेल्वेस्थानकांत येण्या-जाण्यासाठी दररोज मुंबई ठाण्याला पंचवटी, गोदावरी, राज्यराणीने प्रवास करणारे काही प्रवासी या मार्गाचा वापर करतात.मनमाड-इगतपुरी शटल व मुंबई-भुसावळ पॅसेंजरचे काही प्रवासी या मार्गाचा वापर करतात. बाहेरगावचे व लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांना जास्त करून या मार्गाची माहिती नसल्याने त्यांच्याकडून या मार्गाचा वापर केला जात नाही.अचानक मार्ग बंदरेल्वे प्रशासनाकडून गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी अचानक सुरक्षितेचे कारण पुढे करून देवी चौक, जुने पादचारी पुलावरून रेल्वेस्थानकांत येण्या-जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. फ्लॅट फॉर्मवर लोखंडी ग्रीलचा दरवाजा व पादचारी पुलावर पत्रे ठोकून येण्या-जाण्याचा मार्ग बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. देवी चौकात पार्किंग करणाºया प्रवाशांना रेल्वेस्थानकांत येण्या-जाण्यासाठी पायी पायी लांब चकरा माराव्या लागत आहे.सर्वांचीच  झाली गैरसोयदेवीचौक पादचारी पुलावरून रेल्वेस्थानकांत जाण्या-येण्याचा मार्ग बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. विशेष म्हणजे देवीचौक व बाजारपेठेच्या व्यवसायावरदेखील परिणाम झाला आहे. पादचारी पुलावरील रेल्वेस्थानकांत जाणारा-येणारा मार्ग बंद करण्याबाबत आगाऊ सूचना दिली नसून तसा माहितीफलकदेखील न लावण्यात आल्याने प्रवाशांना त्यापर्यंत जाऊन पुन्हा माघारी यावे लागत आहे. प्रवाशांची सोय, भौगोलिक विचार करून किमान दिवसा तरी हा मार्ग सुरू ठेवण्याची गरज आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNashikनाशिक