सिन्नर : शहरातील भूलतज्ज्ञ डॉ. वैजयंती अभिजित काकडे (४३) या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. स्वत:च्या रुग्णालयाच्या गच्चीवर घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. डॉ. काकडे दांपत्य वैद्यकीय क्षेत्रात आहे. गेले अनेक वर्षे त्यांचे सूर्योदय संकुलमध्ये भारती हॉस्पिटल होते. वर्षभरापूर्वीच त्यांनी नाशिक-पुणे महामार्गालगत वाजे पेट्रोल पंपासमोर स्वत:चे हॉस्पीटल उभारले. खालच्या मजल्यावर हॉस्पीटल व दुसऱ्या मजल्यावर काकडे दाम्पत्य राहत होते. मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास डॉ. अभिजीत काकडे यांना अचानक जाग झाली तेव्हा डॉ. वैजंयती या रुममध्ये नव्हत्या. खाली रुग्ण आल्याने त्या खाली गेल्या असाव्यात अशा शक्यतेने ते पाहण्यासाठी गेले. तेव्हा आॅपरेशन रुमचा दरवाजा उघडला दिसला.सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. व्हीसेरा राखून ठेवण्यात आला असून फॉरेन्सीक लॅबला पाठविण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेच्या डॉक्टरांनी दिली. त्यानंतर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत डॉ. वैजयंती यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत.
सिन्नरला महिला डॉक्टरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:38 IST
सिन्नर : शहरातील भूलतज्ज्ञ डॉ. वैजयंती अभिजित काकडे (४३) या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. स्वत:च्या रुग्णालयाच्या गच्चीवर घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे.
सिन्नरला महिला डॉक्टरची आत्महत्या
ठळक मुद्देकारण अस्पष्ट : वैद्यकीय क्षेत्र हादरले