सिन्नरला विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 09:16 PM2021-02-19T21:16:14+5:302021-02-20T01:29:12+5:30

सिन्नर : नियंत्रणात आलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास नगर परिषदेने प्रारंभ केला आहे.

Sinnar takes action against unmasked walkers | सिन्नरला विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

सिन्नरला विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे मोहीम : दोन हजारांचा दंड वसूल

सिन्नर शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर नगर परिषद व सिन्नर पोलीस ठाणे यांच्याद्वारे संयुक्त कारवाई करत रस्त्यावर विनामास्क फिरताना आढळून आलेल्या नागरिकांकडून प्रतिव्यक्ती १०० ते २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुचाकीवर विनामास्क डबल, ट्रिपल सिट, चार चाकी गाडीमध्ये तीनपेक्षा जास्त प्रवासी विनामास्क आढळून आल्यास अशांनाही दंड आकारण्यात आला आहे. अशा प्रकारची कारवाई करत दोन हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सिन्नर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रोहित पगार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, अर्जुन भोळे, तुषार लोखंडे, दीपक भाटजिरे, जगदीश वांद्रे, निवृत्ती चव्हाण, सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस समाधान बोराडे, नितीन गाढवे, अमोल गोडे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.
प्रशासनाकडून आवाहन
सिन्नर शहरातील नागरिकांनी स्वत:हून कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे व निर्देशांचे पालन करत कोरोना निर्मूलन करण्याबाबत सहकार्य करावे. नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावे, मास्कचा वापर करणे, वारंवार स्वच्छ हात धुवावेत असे जाहीर आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Sinnar takes action against unmasked walkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.