शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला गायन, वादन स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:25 IST

सिन्नर येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठान आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

ठळक मुद्देबक्षीस वितरण : १०६ विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग, सृष्टी खालकर प्रथम

सिन्नरच्या संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करतांना शंकरराव वैरागकर. समवेत गोविंद लोखंडे, सोमनाथ पावसे, दिलीप बिन्नर व मान्यवर.सिन्नर : येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठान आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.यावेळी गुरुवर्य शंकरराव वैरागकर, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, नगरसेवक सोमनाथ पावसे, ज्योती वामने, सिल्व्हर लोट्स स्कूलचे अध्यक्ष दिलीप बिन्नर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सतीष नेहे, अनिल पवार, अ‍ॅड. आविष्कार गंगावणे, अण्णासाहेब थोरमिसे, नारायण वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरित करून गौरविण्यात आले. सागर कुलकर्णी व हितेश पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत अभंग, गौळण, भावगीत, भक्तिगीत व चित्रपट गीते, हार्मोनियम आदींचे सादरीकरण करण्यात आले. पंडित वैरागकर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्यांना २५१ ते ११०१ रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती.स्पर्धेतील विजेते विद्यार्थी लहान गटात (गायक) सृष्टी खालकर, शंभूराजे पाटील, किरण कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तर सिद्धी कुलकर्णी हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. (वादन समूहात) हर्षदा आढाव (हार्मोनियम), वैष्णवी सोमवंशी (हार्मोनियम), ज्ञानेश्वर वाघ (पखवाज) आदींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. तर राधिका गुजर (तबला) हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. स्पर्धेचे आयोजन ओंकार संगीत विद्यालयाचे संचालक भारत मांडे यांनी केले. विजय निर्मळ व अनिता म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.मोठ्या गटात (गायनामध्ये) सागर भालेराव, ओमकार वाजे, गायत्री पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. तर (वादनामध्ये) वृषभ चौधरी यास उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. (वादनामध्ये देवेन मुसमाडे (गिटार), सुयोग थोरामिरे (तबला), ओमकार वाजे (हार्मोनियम) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. तर वृषभ चौधरी (हार्मोनियम) यास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाcultureसांस्कृतिक