शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर पोलिसांकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 19:20 IST

सिन्नर: सिन्नरसह तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरुन त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ठळक मुद्देउलगडा: संशयितास अटक; दोन दिवस पोलीस कोठडी

सिन्नर: सिन्नरसह तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरुन त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.सिन्नर शहर आणि तालुक्यात दुचाकी चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर, निफाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्याकडून दुचाकी चोरांचा छडा लावण्याच्या सूचना लॉकडाउन शिथील झाल्यानंतर सिन्नर पोलिसांना करण्यात आल्या होत्या.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद टिळे, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांचे पथक तयार करण्यात आले होते. विविध गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी सदर पथकाकडून शोध सुरु होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचे मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्यातील पथकातील कर्मचारी गणेश परदेशी, विनोद टिळे, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड सिन्नर शहरातील सरदवाडी रोड येथे बायपास पुलाचे जवळ अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी सरदवाडी बाजूकडून सिन्नर बाजुकडे पॅशन मोटारसायकल एम एच १५ डीए ७९७८ याच्यावरील युवकास थांबवून त्याचेकडे सदरचे वाहनाच्या कागदपंत्राची चौकशी करण्यात आली. त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यास सिन्नर पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत सदर मोटारसायकल आॅक्टोबर २०२० मध्ये सरदवाडी रोड भागातील हॉटेल मिलनबारचे पाठीमागुन चोरी केल्याची त्याने कबुली दिली.सदर गुन्हयात संशयित दिनेश विजय बागूल (१९) रा. मापारवाडी, सिन्नर यास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून आणखी चौकशी केल्यानंतर त्याने चोरीच्या सात दुचाकी काढून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितास सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.कागदपत्रे नंतर देतो सांगून विकत होता दुचाकीसंशयित आरोपी हा दुचाकी चोरल्यानंतर कागदपत्रे नंतर देतो असे सांगून दुचाकी विकत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. विकलेल्या दुचाकी संशयिताने सिन्नर शहर, माळेगाव एमआयडीसी, पंचवटी, निमोण ता.संगमनेर, शिर्डी आदी परिसरातून चोरी केल्याबाबत कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी