नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा सिन्नर - नायगाव हा रस्ता संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातप्रवण बनला आहे. अरुंद असलेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्या खोलवर गेल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीबरोबरच संताप व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत या रस्त्याची दुरूस्ती केली नाही तर नायगाव खोऱ्यातील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता सध्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. सिन्नर ते नायगाव पानसरे वस्तीपर्यंतचा बारा किलोमीटर अंतराचा हा रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या कुठे फूट तर कुठे तब्बल दोन फुटांवर खोलीवर गेल्या आहेत. नाशिक - औरंगाबाद या महामार्गाला व तालुक्यातील माळेगाव व मुसळगाव दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर चोवीस तास जड व अवजड वाहनांची वर्दळ असते. असा हा महत्त्वाचा रस्ता असूनही केवळ संबंधित बांधकाम विभाग व लोकप्रतिनीधींच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या विशेषतः दुचाकी चालकांच्या अपघाताच्या आमंत्रणास कारणीभूत ठरत आहे.
--------------------------
आठवड्यात डझनभर अपघात
सिन्नर ते नायगाव या तेरा किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दोन्ही साईडपट्ट्या खोलवर गेल्या आहेत. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर दोन वाहने एकाचवेळी पास होतांना तसेच मोठ्या वाहनांना बाजू देतांना खोल गेलेल्या साईडपट्ट्यांमुळे अपघात होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या आठवडाभरात विविध वाहनांचे तब्बल डझनभर अपघात घडल्यामुळे ग्रामस्थ व प्रवाशांमध्ये भीतीबरोबरच संताप व्यक्त होत आहे.
-----------------
दोन तालुक्यांना जोडल्या जाणाऱ्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, अरुंद व खोलवर गेलेल्या साईडपट्ट्यांमुळे धोकादायक बनल्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. अशा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मागणी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. अशा परस्थितीत केवळ पाच ते सात ठिकाणी मुरूम टाकून विभागाने परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याने संताप व्यक्त होत आहे.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
--------------------
सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सिन्नर-नायगाव - सायखेडा या रस्त्यांच्या साईडपट्ट्या अशा खोलवर गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी खड्ड्यांत पाणी साचत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. (२३ नायगाव ४)
230921\23nsk_16_23092021_13.jpg
२३ नायगाव ४