सिन्नरला लालपरीच्या दररोज २८ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 09:00 PM2020-08-10T21:00:55+5:302020-08-11T01:12:48+5:30

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा एकदा ‘प्रवाशाच्या सेवेसाठी’ दाखल झाली आहे. ५ जूनपासून तीन मार्गांवर धावू लागलेल्या लालपरीच्या दररोज २८ फेºया सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

Sinnar has 28 rounds of Lalpari daily | सिन्नरला लालपरीच्या दररोज २८ फेऱ्या

सिन्नरला लालपरीच्या दररोज २८ फेऱ्या

Next
ठळक मुद्देप्रवाशांची पाठ : मागणी वाढल्यास टप्प्याटप्प्याने वाढविणार फेºया

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा एकदा ‘प्रवाशाच्या सेवेसाठी’ दाखल झाली आहे. ५ जूनपासून तीन मार्गांवर धावू लागलेल्या लालपरीच्या दररोज २८ फेºया सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
५ जूनपासून सिन्नर-नाशिक रस्त्यावर पहिल्यांदाच बस धावताना सिन्नरकरांना दिसली. सिन्नर आगाराने ठाणगाव, औंढेवाडीसह काही गावांमध्ये बसच्या फेºया सुरूही केल्या होत्या. मात्र, ५-७ प्रवाशांव्यतिरिक्त कोणीही एसटीत बसायला तयार होत नव्हते. त्यामुळे हा प्रयत्नही काही दिवसांनी सिन्नर आगाराने थांबविला होता. केंद्र शासनाने ५ आॅगस्टपासून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आगाराने सर्वाधिक उत्पन्न देणाºया सिन्नर-नाशिक मार्गावर आजपासून फेºया सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ८.३० वाजेपासून दिवसभरात परतीसह चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. पहिल्या तीन फेºयांमध्ये प्रत्येकी पाच ते सहा प्रवासी मिळाले तर परतीच्या प्रवासात एखाद्याच प्रवाशाने एसटीला पसंती दिली.
तोंडाला मास्क असल्याशिवाय कुणालाही बसमध्ये प्रवेश मिळणार नाही. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील बालकांना बसमधून प्रवास करण्यास शासनाने परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे त्यांनी प्रवासासाठी बसस्थानकावर येऊ नये, असे आव्हान करण्यात येत आहे. प्रवशांची मागणी वाढल्यास टप्प्याटप्प्यात बसफेºया वाढवण्यात येणार आहेत. तालुक्यातील ठाणगाव व औंढेवाडी येथेही बसच्या दररोज प्रत्येकी पाच फेºया सुरू करत आहोत. ठाणगाव व औंढेवाडीसाठी एका बाजूचे प्रवासभाडे पूर्वीप्रमाणेच २५ रुपये आकारले जाणार आहे. एसटीचा प्रवास हा सुखाचा व सुरक्षित असून, कोविडच्या या संकटात एसटीलाही आत्मनिर्भर बनवण्यासाठी एसटीतून प्रवास करावा, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे. सॅनिटायझरची व्यवस्थाशासनाने ४५ प्रवासी क्षमता असणाºया बसला केवळ २२ प्रवासी घेण्याची परवानगी दिली आहे. तरीही प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस सज्ज आहेत. सिन्नर-नाशिक प्रवासासाठी पूर्वीप्रमाणे ४० रुपयेच भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी दिली. बस आगारातून बाहेर पडतानाच आतून-बाहेरून सॅनिटाईज केली जाते. वाहकाकडे अतिरिक्त सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Sinnar has 28 rounds of Lalpari daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.