लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सिन्नर तालुक्यातील अनेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाने केलेले योग्य नियोजन आणि तत्काळ उपचारांमुळे आतापर्यंत ४००हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. येथील वैद्यकीय पथकाच्या कामकाजाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी टीमचा गौरव केला आहे.जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे सिन्नर ग्रामीण रुग्णालयाला हे यश मिळाल्याचे कार्यरत असलेल्या पथकाने सांगितले. सिन्नर येथील कोविड सेंटरमधून २९ जुलैला १९ रु ग्णांना घरी सोडण्यात असून, उर्वरित ५०० रु ग्णांनादेखील लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.निर्मला गायकवाड यांनीसांगितले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. संजय वळवे, रुग्णालयातील सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने कोरोना रु ग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीचाच अवलंब केला. त्यामुळेच सिन्नरची वाटचाल कोरोनामुक्त तालुक्याकडे सुरू आहे. सिन्नर येथे रु ग्णांसाठी ६० खाटांची व्यवस्था असलेली अद्ययावत नवीन इमारत असून, त्यात रु ग्णांसाठी उत्कृष्ट स्वच्छतेची व्यवस्था, जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. महत्त्वाची भूमिकासिन्नर रुग्णालयात बसविण्यात आलेली सेंट्रल आॅक्सिजन लाइन अत्यंत मोलाची ठरली. या सेंट्रल लाइनमुळे कोणत्याही रुग्णाचा आॅक्सिजनअभावी बळी गेला नाही. या लाइनमुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आरोग्य विभागाला यश आल्याने ती रुग्णांसाठी वरदान ठरली आहे.
सिन्नरला चारशेहून अधिक कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:45 IST
नाशिक : सिन्नर तालुक्यातील अनेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाने केलेले योग्य नियोजन आणि तत्काळ उपचारांमुळे आतापर्यंत ४००हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. येथील वैद्यकीय पथकाच्या कामकाजाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी टीमचा गौरव केला आहे.
सिन्नरला चारशेहून अधिक कोरोनामुक्त
ठळक मुद्देसुटकेचा नि:श्वास : सेंट्रल आॅक्सिजन लाइनने वाचवले अनेकांचे प्राण