शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कल्याण केंद्र्च्या भजन स्पर्धेत सिन्नर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:52 IST

नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक गट कार्यालयांतर्गत झालेल्या पुरुष भजन स्पर्धेत सिन्नर केंद्रास प्रथम क्रमांक मिळाला.या स्पर्धेत सिन्नर, सातपूर, एकलहरे, बुधवारपेठ, सिडको, नेहरुनगर, विहितगाव, देवळालीगाव, ओझर आदी ठिकाणच्या कामगार केंद्रांनी भाग घेतला. स्पर्धेचे परिक्षक म्हणुन चारुदत्त दीक्षित, श्याम दशपुत्रे, नंदकुमार देशपांडे यांनी काम पाहीले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या ...

नाशिक: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक गट कार्यालयांतर्गत झालेल्या पुरुष भजन स्पर्धेत सिन्नर केंद्रास प्रथम क्रमांक मिळाला.या स्पर्धेत सिन्नर, सातपूर, एकलहरे, बुधवारपेठ, सिडको, नेहरुनगर, विहितगाव, देवळालीगाव, ओझर आदी ठिकाणच्या कामगार केंद्रांनी भाग घेतला. स्पर्धेचे परिक्षक म्हणुन चारुदत्त दीक्षित, श्याम दशपुत्रे, नंदकुमार देशपांडे यांनी काम पाहीले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र सिन्नरच्या संघास प्रथम पारितोषिक मिळाले. कामगार कल्याण भवन सातपूरला द्वितीय तर एकलहरे केंद्रास तिसरा क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थमध्ये प्रथम बुधवारपेठ केंद्र तर दुसरे सातपूर वसाहत केंद्रास मिळाले. उत्कृष्ट तालसंघाचे प्रथम पारितोषिक विहीतगाव वसाहत, द्वितिय नेहरुनगर व तृतीय सातपूर वसाहत मानकरी ठरले. सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी महंत कृष्णदासजी नागे महाराज होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रेस मजदुर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, सहाय्यक कल्याण आयुक्त भावना बच्छाव होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र नांदे यांनी तर आभार संदिप चव्हाण यांनी मानले.चौकट-----वैयक्तिक पारितोषिके पुढील प्रमाणे- उत्कृष्ठ गायक- भारत मांडे (सिन्नर), दत्तात्रेय जाधव (सिडको), मुकुंद कुलकर्णी (सातपूर); उत्कृष्ठ पखवाज,तबला वादक- विनायक कोरे (सातपूर), ज्ञानेश्वर सोनवणे (बुधवार पेठ), सचिन सानप (एकलहरे); उत्कृष्ट हार्मोनियम- भगवंत लेले (सिडको), अर्जुन घोटेकर(सातपूर), विजय जगताप (नेहरुनगर)

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक