सिन्नर येथे पतंग व मांजा विक्रेत्याच्या दुकानात नायलॉन मांजाची तपासणी करताना नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रोहित पगार. समवेत सुनील शिंदे, नितीन परदेशी व कर्मचारी.सिन्नर : नगर परिषदेच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध दुकानांत नायलॉन मांजा विक्रीबाबतची तपासणी केली. पतंग विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा आढळून आला नाही. तथापि, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. दोघा व्यावसायिकांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार असा १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.शहरात पतंग विक्रेत्यांच्या दुकानात नायलॉन मांजाची झाडाझडती करण्यात आली. तथापि, नायलॉन मांजा आढळून आला नसल्याचे पथकाने सांगितले. नायलॉन मांजाची विक्री करताना आढळल्यास कारवाईचा इशारा नगराध्यक्ष किरण डगळे व उपमुख्याधिकारी रोहित पगार यांनी दिला आहे.वावी वेस, बाजार समिती संकुल, शिवाजी चौक, गणेश पेठ, लाल चौक, महालक्ष्मी मार्ग, नाशिकवेस, नवीन पूल, नेहरू चौक आदी भागातील दुकानांची पाहणी करण्यात आली. नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पथकाने यावेळी दिला. नायलॉन मांजा विक्री ठेवत नसल्याचे बहुतांश दुकानदारांनी पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले.उपमुख्याधिकारी रोहित पगार, नितीन परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दुकानांची पाहणी केली. विद्युत अभियंता अशोक कट्यारे, आरोग्य विभागाचे दीपक पगारे, मिळकत अधिकारी सुनील शिंदे, ताहीर शेख, राकेश शिंदे, गीतांजली मरडे, गोरख वाघ, जगदीश वांद्रे आदींचा पथकात समावेश होता.पथकाने याचवेळी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याबाबतचीही पाहणी केली. सुखसागर स्वीट्स, डिलक्स बेकरी या दोन ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
सिन्नरला नायलॉन मांजाची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:21 IST
नगर परिषदेच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध दुकानांत नायलॉन मांजा विक्रीबाबतची तपासणी केली. पतंग विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा आढळून आला नाही. तथापि, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. दोघा व्यावसायिकांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार असा १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सिन्नरला नायलॉन मांजाची तपासणी
ठळक मुद्देप्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दोघांकडून दंड वसूल