शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

सिन्नर विधानसभा मतदारसंघात २२ हजार मतदारांची वाढ, तरुणांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 05:45 IST

नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सिन्नर विधानसभा मतदार संघात आतापर्यंत दोन लाख ९३ हजार २५५ मतदारांची नोंद झाली आहे. मागील २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या दोन लाख ७१ हजार ४०४ होती.

सिन्नर - नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सिन्नर विधानसभा मतदार संघात आतापर्यंत दोन लाख ९३ हजार २५५ मतदारांची नोंद झाली आहे. मागील २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या दोन लाख ७१ हजार ४०४ होती.यावेळी विधानसभा मतदारसंघात २१ हजार ८५१ इतक्या मतदारांची भर पडली आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तहसील कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती कावरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सिन्नरचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील, निवासी नायब तहसीलदार दत्ता जाधव, दिलीप पवार, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार नरेंद्र वाघ उपस्थित होते.बीएलओमार्फत नवीन रंगीत मतदान कार्डाचे वाटपलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेमुळे अनेक नवमतदारांनी आपली नावे नोंदविली. या नवमतदारांना रंगीत ओळखपत्रांचे वितरण बीएलओमार्फत केले जाणार आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात ११ हजार ९८६ नवीन मतदारांना हे रंगीत ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे.२१ हजार ८५१ नवमतदार प्रथमच करणार मतदाननिवडणूक प्रशासनाकडून विशेष मोहिमेद्वारे २१ हजार ८५१ नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील ४ हजार ३८८ मतदारांचा समावेश आहे. निवडणूक शाखेतर्फे १ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर दरम्यान मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यानंतर २३ व २४ फेब्रुवारी तसेच २ व ३ मार्च दरम्यान मोहिमेत फॉर्म क्रमांक ६ भरून नोंदणी केली होती. त्यामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघात आता १ लाख ५४ हजार ६३६ पुुरुष व १ लाख ३८ हजार ६१९ स्त्रिया अशी २ लाख ९३ हजार २५५ एवढी मतदारसंख्या झाली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक