शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दीष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:04 IST

आगामी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. सिन्नर तालुक्यात १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तालुकास्तरावर स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सिन्नर : आगामी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे.सिन्नर तालुक्यात १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तालुकास्तरावर स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे. १ सप्टेंबरला प्रारुप मतदार याद्या १ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुक्यात २ मतदान केंद्रांची वाढ झाली असून आता ३०९ केंद्र असतील. २ लाख ८१ हजार मतदार संख्या असून नोंदणी न केलेल्या मतदारांचा शोध घेवून १०० टक्के नोंदणी करण्याचे उद्दीष्टही निवडणूक शाखेने ठेवले आहे. या उपक्रमात विभागनिहाय जबाबदाºयाही देण्यात आल्या आहेत. त्यातच याद्यांच्या दुरुस्तीचे कामही सुरु आहे. दुबार नावे, मयत व स्थलांतरीत मतदारांपैकी ४ हजार ५०० नावेही यादीतून वगळण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार नरेंद्र वाघ यांनी दिली. शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विविध विभागांचे अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी व राजकीय प्रतिनिधींच्याही बैठका घेण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणी न केलेल्यांनी तातडीने नोंदणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनजागृतीसह मतदार नोंदणी करण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. महिला, अपंग यांची पूर्णत: नोंदणी करण्यावरही भर देण्यात आला आहे.स्वीप समितीची स्थापना दीपमाला चौरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष, बालविकास प्रकल्प अधिकारी एल. डी. गवळी, एफ ई. राऊत, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, सचिव नितीन गवळी हे समितीत असणार आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिकElectionनिवडणूक