शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
3
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
4
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
5
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
6
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
7
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
8
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
9
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
10
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
11
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
12
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
13
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
14
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
15
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
16
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
17
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
18
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
19
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
20
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...

तरुणाईने साधनेतून घडवावे गाणे

By admin | Updated: December 6, 2015 23:53 IST

पं. प्रभाकर कारेकर : राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नाशिक : संगीत क्षेत्रातील सध्याची पिढी अत्यंत गुणवान असून, तिने परिश्रमपूर्वक साधना, रियाज करून गाणे घडवावे, अशी अपेक्षा प्रख्यात गायक पं. प्रभाकर कारेकर यांनी व्यक्त केली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ख्याल गायन व उपशास्त्रीय संगीत स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, सहकार्यवाह अरविंद ओढेकर, अ‍ॅड. विलास लोणारी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने आॅक्टोबरमध्ये ख्याल व उपशास्त्रीय गायनाची स्पर्धा घेण्यात आली होती. ख्याल गायन स्पर्धेत ठाणे येथील रोहित धारप व औरंगाबाद येथील कौस्तुभ कुलकर्णी यांना प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपये पारितोषिक (विभागून) जाहीर झाले होते.औरंगाबाद येथील रोहन गावडे यांनी द्वितीय (सात हजार), तर निहिरा निसर्ग व कुलभूषण कहाळेकर यांनी तृतीय पारितोषिक (पाच हजार, विभागून) पटकावले होते. तसेच उपशास्त्रीय संगीत स्पर्धेत मंगेश कुलकर्णी (जुन्नर) यांनी प्रथम (दहा हजार), रोहन गावडे (औरंगाबाद) यांनी द्वितीय (पाच हजार), तर संतोष देशमुख (राजगुरूनगर) यांनी तृतीय पारितोषिक (तीन हजार) पटकावले होते. केतकी भट व मंगेश कुलकर्णी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी एक हजार) जाहीर झाली होती. स्पर्धेचे परीक्षण पं. उपेंद्र भट, आशालता करलगीकर, पं. शंकर वैरागकर, अनिल दैठणकर यांनी केले होते. या सर्व विजेत्यांना पं. प्रभाकर कारेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रारंभी ज्येष्ठ लेखक मुरलीधर खैरनार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मकरंद यांनी प्रास्ताविक केले.