शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

साधेपणाने लग्नामुळे कोट्यवधींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:56 IST

अख्ख्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र याच कोरोनामुळे वायफळ खर्च होणाºया कोट्यवधी रुपयांची बचत होत असल्याचे सुखद चित्र सध्या होत साध्या पद्धतीच्या विवाह सोहळ्यांवरून दिसत आहे. अवघ्या हजारो रुपयांमध्ये यंदा कर्तव्य पार पडत आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या भीती । आर्थिक घडी विस्कटल्याचा परिणाम

दत्ता दिघोळे ।नायगाव : अख्ख्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र याच कोरोनामुळे वायफळ खर्च होणाºया कोट्यवधी रुपयांची बचत होत असल्याचे सुखद चित्र सध्या होत साध्या पद्धतीच्या विवाह सोहळ्यांवरून दिसत आहे. अवघ्या हजारो रुपयांमध्ये यंदा कर्तव्य पार पडत आहे.जीवघेण्या विषाणूने संपूर्ण जगात आपले हातपाय पसरले आहे. कोरोनाच्या कहराने देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्याने बेरोजगारीची भीती निर्माण केली आहे. ग्रामीण भागावरही कोरोनाने आपली दहशत जमवली आहे. असे असले तरी या कोविड-१९च्या भीतीपोटी व सुरक्षेच्या कारणांमुळे खेड्यातील लाखो रुपयांची बचत झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.कोरोनाचा जेव्हापासून शिरकाव वाढला तेव्हापासून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र याच कोरोनामुळे गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच काटकसरीने जीवन जगण्यास भाग पाडले आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने लादल्यामुळे वर्षभरात जमलेले विवाहही अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत मोजक्या वºहाडींच्या उपस्थितीत परवानगी मिळताच विवाहांना सुरुवात झाली. मात्र मोठ्या बडेजावात होणारे विवाह अतिशय साध्या पद्धतीने आणि तेही अंगणात होऊ लागले.एकट्या नायगाव खोºयात झालेले शेकडो विवाह केवळ हजारो रुपयांत पार पडले. अशा पद्धतीने झालेल्या लग्न समारंभातून कोट्यवधी रुपयांची बचत झाल्याचे सुखद चित्र यंदा दिसत आहे. कोरोनामुळे का होईना सार्वजनिक कार्यक्र म साध्या पद्धतीने होत आहेत. अशा पद्धतीनेच यापुढेही सर्वच कार्यक्र म कमी नातेवाईक, आप्तेष्टांच्या उपस्थितीत साजरे करण्याची नवीन पद्धत सर्वच समाजाने अंगीकारली तर नक्कीच एक आदर्श निर्माण होऊ शकेल, अशी चर्चा होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न