सिडको : येथील वामनराव सोनवणे प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सवानिमित्त पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी व हिंंदी भावगीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.राणेनगर येथील वामनराव सोनवणे प्रतिष्ठानच्या वतीने पाडवा पहाट महेश धोडपकर प्रस्तुत मेघ मल्हार सहकलाकार यांची मराठी व हिंदी भावगीते ऐकताना उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. गायक चेतन थाटशिंगार व गायिका मीनल धोडपकर यांनी यावेळी मराठी व हिंदी गाणी गायली. कार्यक्रमाची सुरुवात ओंकार स्वरूपा या गाण्याने झाली. यानंतर उजळून आलं आभाळ... , रामाच्या पहारी.... जिवा-शिवाची बैल जोडी..., दीपा-रे दीपारंग..., चांगभलं रं.., बाजे मुरलीया बाजे..., कानडा राजा पंढरीचा, हिरवा निसर्ग अशी अनेक गाणी यावेळी गायकांनी सादर केली. या गीतांना कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रसिकांनीही दिलखुलास अशी दाद दिली. यावेळी निवेदक गणेश कड, की-बोर्ड-अतुल गांगुर्डे, आनंदा ओक आदिंनी साथ दिली. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक सुमन सोनवणे व राहुल सोनवणे यांनी केले. याप्रसंगी नीलेश राणे, संतोष कमोद, शशिकांत भालेराव, नितीन देशपांडे, सनी रोकडे, गणेश जाधव, बाळ भाटिया, बबलू सूर्यवंशी, देवीदास लाड आदि उपस्थित होते.
अवघे रसिक भावगीतांत तल्लीन
By admin | Updated: November 14, 2015 22:23 IST