शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अठराव्या शतकातील चांदीची नाणी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:02 IST

भगूर रेल्वे लाइनजवळील जुने घर पाडण्यासाठी खोदत असताना १८व्या शतकातील प्राचीन चांदीच्या धातूची ४६ नाणी सापडल्याची घटना भगूर रेल्वे लाइनजवळ घडली आहे़

नाशिकरोड : भगूर रेल्वे लाइनजवळील जुने घर पाडण्यासाठी खोदत असताना १८व्या शतकातील प्राचीन चांदीच्या धातूची ४६ नाणी सापडल्याची घटना भगूर रेल्वे लाइनजवळ घडली आहे़ विशेष म्हणजे मजुरांमध्ये नाणी वाटपावरून वाद झाला व तो पोलीस ठाण्यात पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आला़ दरम्यान, ही नाणी नाशिकरोड पोलिसांनी जमा केली आहे़  भगूर गावातील रेल्वे लाइनजवळील जुने घर पाडण्यासाठी विहितगाव, बागुलनगरमधील चार-पाच मजूर गेले होते़ घर पाडत असताना एका ठिकाणी खड्डा करताना मजुरांना गुरुवारी (दि़२७) चांदीची ४६ पुरातन नाणी सापडली़ या सापडलेल्या नाण्यांच्या वाटपावरून मजुरांमध्ये रात्री वाद झाले व नाशिकरोड पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी या मजुरांना बोलावून घेतल्यानंतर भगूरमधील घर पाडताना खोदकाम करताना नाणी सापडल्याचे समोर आले़नाशिकरोड पोलिसांनी १८व्या शतकातील ४६ चांदीची नाणी जप्त केली असून, या मजुरांना भगूरमध्ये कोणाच्या घर पाडण्याचे काम मिळाले तेदेखील सांगता येत नसल्याचे ढोकणे यांनी सांगितले़ दरम्यान, संबंधित मजुरांकडून या घराची माहिती घेतल्यास तसेच या ठिकाणी खोदकाम केल्यास आणखी काही नाणी सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याकडे पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे़

टॅग्स :Nashikनाशिक