शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:31 IST

मोकभणगीत बैठक : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा निर्धार

ठळक मुद्देकळवण तालुका विरु ध्द सटाणा नगरपालिका असा संघर्ष आता पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कळवण : तालुक्यातील जलाशयात असलेल्या पाण्यावर प्रथम हक्क तालुक्यातील जनतेचा असल्याने अर्जुनसागर(पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरापर्यत जलवाहिनी टाकण्यास तिव्र विरोध दर्शवत कळवण तालुक्यातून जलवाहिनी जाऊ देणार नाही, यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्धार मोकभणगी येथे बुधवारी (दि.६) झालेल्या बैठकीत शेतक-यांनी केला.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाशवभूमीवर सटाणा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ९ फेब्रुवारी रोजी होत असल्याने कळवण तालुक्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. मोकभणगी येथे आयोजित लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार,बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे, पंचायत समितीचे सभापती केदा ठाकरे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव,मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, मोहन जाधव, शांताराम जाधव , रायुकॉचे तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ यांनी विरोध दर्शवत कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन जनआंदोलन करण्याचा इशारा दिल्याने कळवण तालुका विरु ध्द सटाणा नगरपालिका असा संघर्ष आता पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान सटाणा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात ८ फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाला घेराव व कोल्हापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन तर ९ फेब्रुवारी रोजी अर्जुनसागर(पुनंद)प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी यावेळी दिली.जलवाहिनीला विरोधमोकभणगी येथे अर्जुनसागर(पुनंद)प्रकल्प लाभक्षेत्रातील 40 गाव वाड्या वस्तीवरील प्रमुख पदाधिकारी व शेतकरी बांधवांची बैठक शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनीअर्जुनसागर(पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी पुरवठा योजना राबविल्यास मोठे संकट उभे राहणार असल्याचे सांगत हा जीवनमरणाचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले. रवींद्र देवरे यांनी चणकापूरमधून मालेगावसाठी पाणी आरक्षणात सातत्याने वाढ झाल्याने शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांना आज पाणी मिळत नसल्याचे सांगितले. बैठकीचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी कळवण तालुक्यातून पाणी बाहेर पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले. बैठकीस लाभक्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी