शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नाशकात मनपा शिक्षण समिती गठित होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:43 IST

प्रशासनाकडून हालचाली : शासनाकडून ठराव विखंडित होण्याची शक्यता

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वीच प्रशासनाने महासभेचा ठराव विखंडनासाठी पाठविलेला आहेसरकारचा कायदाच बदलून टाकण्याचे धाडस करणारा हा प्रस्ताव महासभेवर भाजपा गटनेत्यांनी ठेवला होता

नाशिक : गेल्या वर्षभरापासून महापालिका शिक्षण समिती गठित झालेली नाही. परंतु, प्रशासनाकडून शासनाच्या नियमानुसार शिक्षण समिती गठित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून शासनाकडे महासभेचा पाठविलेला ठराव विखंडित करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. दोन महिन्यांपूर्वीच प्रशासनाने महासभेचा ठराव विखंडनासाठी पाठविलेला आहे.शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळ स्थापन करण्यासंबंधीचा प्रस्ताव मे २०१७ मध्ये झालेल्या महासभेत भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी मांडला होता. सदर ठराव महासभेने मंजूरही केला होता. त्यानंतर, नगरसचिव विभागाने सदर ठराव विखंडनासाठी न पाठविता त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. परंतु, महाराष्ट प्रांतिक अधिनियमात मार्गदर्शनाची तरतूद नसल्याचे सांगत सदरचा ठराव जर शासनाच्या नियमाविरुद्ध झाला असेल तर तो विखंडनासाठी का पाठविला नाही? असा सवाल करत प्रशासनाला फटकारले होते. त्यानंतर, प्रशासन हलले आणि महासभेने शिक्षण मंडळ पुनर्गठणाचा केलेला ठराव डिसेंबर २०१७ मध्ये शासनाकडे विखंडनासाठी पाठविण्यात आला. या सा-या प्रकरणात महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर नामुष्की ओढवली. कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी सरकारचा कायदाच बदलून टाकण्याचे धाडस करणारा हा प्रस्ताव महासभेवर भाजपा गटनेत्यांनी ठेवला होता. परंतु, सरकारने फटकारल्याने भाजपाचाही मुखभंग झाला होता. आता सदरचा ठराव विखंडनासाठी पाठवून दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अद्याप शासनाकडून त्याबाबत प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शिक्षण मंडळाकडेही लक्ष घातले असून नियमानुसार शिक्षण समिती गठित करण्यासंबंधी निर्देश दिल्याचे समजते. त्यानुसार, शासनाकडे सदर ठराव विखंडित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असल्याने रखडलेली शिक्षण समिती गठित होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.पुरस्कार वितरणही लांबलेमहापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने मागील वर्षी ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली परंतु, आता सहा महिने उलटले तरी अद्याप या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुहूर्त लाभू शकलेला नाही. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महापौरांकडे तारीख मागितल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते. परंतु, लग्न,सभा-समारंभांना हजेरी लावणाºया महापौरांना सहा महिन्यात वेळ मिळाला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाeducationशैक्षणिक