शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या नऊ प्रेरकांकडून देवळ्यात मुल्यवर्धनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:42 IST

सिन्नर : येथील सिन्नर गटातील जिल्हास्तरावरून विशेष निवड झालेल्या नऊ शिक्षकांनी नुकतेच देवळा तालुक्यातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धनसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण दिले.

सिन्नर : येथील सिन्नर गटातील जिल्हास्तरावरून विशेष निवड झालेल्या नऊ शिक्षकांनी नुकतेच देवळा तालुक्यातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धनसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण दिले. एस. सी. आर. टी. पुणे व शांतिलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण जिल्हा स्तरावरून आयोजित करण्यात आले होते.सिन्नर तालुक्यातील ज्या नऊ शाळेत उत्कृष्टपणे मूल्यवर्धन उपक्रम राबवला अशा ठिकाणच्या नऊ शिक्षकांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून देवळा तालुक्यात प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. मुल्यवर्धन ही काळाची गरज असून तो अभ्यासक्रमाचा भाग आहे. येणारी पिढी सुजाण नागरिक म्हणून निर्माण व्हावी, हा हेतू ठेवून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांवर मुल्य रूजवणे आवश्यक आहे. विविध उपक्र म, खेळ, गोष्टी, अध्यापन पद्धती व कृती यांच्या माध्यमातून मूल्यवर्धित अभ्यासक्रम शासनाने तयार केला आहे. त्याद्वारे प्रशिक्षण दिलेले शिक्षक आपल्या वर्गात व शाळेत हा उपक्र म राबवणार आहेत. संगीता महिरे, संजय खरात, गोरक्ष सोनवणे, अश्विनी पाटील, भानुदास बेनके, रवींद्र सातव, कविता लोहार, भारत कापडणीस, राजेंद्र कोकाटे या नऊ प्रेरकांनी अनुक्र मे पिंपळगाव, देवळा, उमराणे, लोहणरे या बीटातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रमाचे धडे दिले. प्रशिक्षण यशस्वी केल्याबद्दल नाशिकच्या अधिव्याख्यात्या डॉ. भारती बेलन, देवळाचे गट शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, विस्तार अधिकारी एस. जी. बच्छाव, विजया फलके, नंदकुमार देवरे, किरण विसावे, केंद्रप्रमुख शिरीष पवार, दिलीप पाटील, रावबा मोरे, जयश्री पवार, संजय ब्राम्हणकार, घनश्याम बैरागी, मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक जगन्नाथ सोनटक्के, विजय धनवे, तालुका समन्वयक अतुल पवार, शरद थोरात, मुश्ताक शेख आदींनी सिन्नर टीमचे आभार मानले.

टॅग्स :Teacherशिक्षक