शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

लष्करी अळीचा बाजरी, द्राक्ष पिकांना वेढा

By श्याम बागुल | Updated: September 26, 2019 20:18 IST

मूळ अमेरिका त्यानंतर भारतात उत्तराखंडाच्या मार्गाने प्रवेश करणा-या अमेरिकन लष्करी अळीने यंदा खरिपाच्या मक्यावर घाला घातला आहे. प्रारंभी स्वीटकॉर्नवर आढळलेली अळी खरिपात सरसकट मक्यावर दिसू लागली असून, जिल्ह्यातील सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरवरील मक्यापैकी एक लाखाहून अधिक हेक्टरवरील पीक सप्टेंबरपर्यंत नष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमक्याचे ५० टक्के नुकसान : शेतकरी वर्ग धास्तावला शेतक-यांनी उभ्या मक्याच्या पिकावर रोटर फिरवून दुस-या पिकाची तयारी केली,

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेरणीनंतर लगेचच मक्याला कवेत घेणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीने आता आपला मोर्चा मका पिकाला लागून असलेल्या पिकांकडे वळविला असून, बाजरी पाठोपाठ आता द्राक्षबागांवरही लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. या अळीच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे कृषी विभाग व शेतकऱ्यांनी हात टेकले असून, वेळीच तिचा उपद्रव रोखला नाही तर जवळपास ८० प्रकारच्या पिकांना अळी विळखा मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मूळ अमेरिका त्यानंतर भारतात उत्तराखंडाच्या मार्गाने प्रवेश करणा-या अमेरिकन लष्करी अळीने यंदा खरिपाच्या मक्यावर घाला घातला आहे. प्रारंभी स्वीटकॉर्नवर आढळलेली अळी खरिपात सरसकट मक्यावर दिसू लागली असून, जिल्ह्यातील सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरवरील मक्यापैकी एक लाखाहून अधिक हेक्टरवरील पीक सप्टेंबरपर्यंत नष्ट झाले आहे. लागवडीनंतर अवघ्या महिनाभरात मक्यावर ठाण मांडणाºया या लष्करी अळीने प्रारंभी मक्याच्या पानावर घाला घातला व त्यानंतर आता तर थेट मक्याच्या कणसात प्रवेश केल्याने तिचा नायनाट करण्यासाठी शेतकºयांनी वापरलेल्या महागड्या औषधांचाही तिच्यावर परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ताशी ४५० किलोमीटरच्या वेगाने प्रवास करणाºया लष्करी अळीकडून २२ दिवसांतच अंडी दिली जाते व त्याचे प्रमाणही दोन हजार अंडी एकाच वेळी पिकावर सोडली जात असल्याने तिचा प्रसार व प्रादुर्भाव वेगाने होत आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्यावर मक्यावरील अळीचा प्रादुर्भाव जोराच्या पावसाने कमी होईल, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला होता, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर काही शेतक-यांनी उभ्या मक्याच्या पिकावर रोटर फिरवून दुस-या पिकाची तयारी केली, परंतु पिकावरून मातीत अंडी घातलेल्या लष्करी अळीने दुसºया नवीन पिकालाही लक्ष्य केले आहे. मक्याला वेढा दिल्यानंतर आता लगतच्या शेतातील बाजरी व द्राक्ष बागांवरही या अळ्या आढळू लागल्या असून, त्यामुळे काढणीला आलेली बाजरी व छाटणीला आलेल्या द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. झपाट्याने संपूर्ण पीकच कवेत घेणाºया या अळीच्या धास्तीने काही द्राक्षबागायतदारांनी पिकावर चिकट पट्टीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून द्राक्षबागेच्या शेंड्यावर चढणारी लष्करी अळी चिकटपट्टीला चिकटून तेथेच अडकून पडणार आहे. साधारणत: हंगामपूर्व द्राक्ष घेणाºया पट्ट्यातील शेतक-यांनी या पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक