शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

ठेंगोडाच्या सिद्धिविनायकाचे भाविकांना केवळ मुखदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 10:36 PM

लोहोणेर : अंगारकी चतुर्थीचा योग यंदाच्या कॅलेंडर वर्षात प्रथमच आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दीड वर्षाने जुळून आला. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मंदिर ट्रस्टने केलेल्या आवाहनामुळे ठेंगोडा येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देखबरदारी : कोरोनामुळे रोडावली संख्या

लोहोणेर : अंगारकी चतुर्थीचा योग यंदाच्या कॅलेंडर वर्षात प्रथमच आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दीड वर्षाने जुळून आला. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मंदिर ट्रस्टने केलेल्या आवाहनामुळे ठेंगोडा येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले.

अंगारकी चतुर्थी म्हणजे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांसाठी पर्वणी असते. अंगारकीला गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी करीत असतात. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठेंगोडा येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची कमी गर्दी दिसून आली.

गाभाऱ्यात गर्दी न करता बाहेरून श्रींचे दर्शन घ्यावे, या ट्रस्टने केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद दिला. अंगारकीनिमित्त मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सटाणा न्यायालयाचे न्यायाधीश आव्हाड यांच्या हस्ते सपत्निक बाप्पांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर गाभारा बंद करून सर्वांना श्रींच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला व नवसाला पावणारा गणपती म्हणून स्वयंभू सिद्धिविनायकाची सर्वत्र ख्याती आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिराच्या परिसरात मोठी यात्रा भरत असते. यंदा श्रींचा गाभारा दर्शनासाठी बंद असला तरी पूजासाहित्य व फराळाची दुकाने थाटण्यात आलेली होती. यंदा महाप्रसादाचे वाटपही ट्रस्टच्या वतीने बंद करण्यात आले होते.

फोटो - ०२ लोहोणेर गणपती-१/२अंगारकी चतुर्थी निमित्ताने ठेंगोडा येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ट्रस्टच्या वतीने भाविकांना श्रींचे मुखदर्शन देण्यात आले. चौकटीत श्री सिद्धिविनायकाची मूर्ती.

टॅग्स :ganpatiगणपतीTempleमंदिर