शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला जिवंत देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:29 IST

शहरातील पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना कशाप्रकारे राजकीय हस्तक्षेपाचा त्रास सहन करावा लागतो, याचा हुबेहूब सजीव देखावा सिडकोतील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला आहे.

सिडको : शहरातील पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना कशाप्रकारे राजकीय हस्तक्षेपाचा त्रास सहन करावा लागतो, याचा हुबेहूब सजीव देखावा सिडकोतील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला आहे.  अंबड-लिंकरोडवरील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळ गेल्या सहा-सात वर्षांपासून सर्जिकल स्ट्राइक, वृद्धाश्रम, शेतकरी आत्महत्या, अमर जवान, अंधश्रद्धा यांसह विविध प्रकारच्या सत्य घटनांवर आधारित सजीव देखावे सादर केले आहेत. यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने पोलिसांवरील राजकीय हस्तक्षेपामुळे येणाऱ्या दबावाचा जिवंत देखावा सादर केला आहे.  मद्यसेवन करून सिग्नल तोडणे यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया व्यक्तींना पोलिसांकडून पकडले जाते. यावेळी सदर व्यक्ती राजकीय पुढाºयांचे कार्यकर्ते अथवा संबंधित असल्यावर ट्रॅफिक पोलिसांना कशाप्रकारे त्रास होतो याबाबतचा सजीव देखावा सादर करण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पूजा पेंढारकर, पोलीस उपनिरीक्ष ललित खैरनार, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गोसावी, प्रज्ञा पेंढारकर, मोरे आदींनी भूमिका निभावल्या आहेत.एखाद्या व्यक्तीस पोलिसांनी न सोडल्यास राजकीय पुढारी हे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना फोन करतात. यानंतर संबंधित अधिकाºयास वरिष्ठांकडून त्या कार्यकर्त्याला सोडून द्यावे लागते. चांगल्या कामात व्यत्यय आणण्याचे काम राजकीय पुढारी कसे करतात व त्यास वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनादेखील कसे बळी पडावे लागते, याबाबतचा सजीव देखावा सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाच्या वतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर खैरनार, उपाध्यक्ष महेश चौधरी, श्रीकांत भाटे, सुनील भोर, अभय भालके, मिलिंद वाडेकर आदी प्रयत्नशील आहेत.पोलिसांच्या अडचणींवर प्रकाशझोतकायदा व सुव्यस्थेसाठी पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावीत असतात. काही वेळा राजकीय दबावामुळे त्यांना कामात अडचणी येतात. या अडचणींवर प्रकाशझोत टाकण्याचे काम सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNashikनाशिक