मनमाड : परप्रांतीय लोकांना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारातून दररोज अनेक श्रमिक स्पेशल गाड्या धावत आहेत. परंतु काही आधीच विविध आजाराने त्रस्त असलेले लोक प्रवास करत असल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो.प्रवासादरम्यान पूर्वीच्या आजाराने गाडीत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून, आजारी व वयस्कर लोकांनी प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वे सूत्रांनी केले आहे. परप्रांतीयांना स्वत:च्या घरी जाऊ शकतील यासाठी श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आलेल्या आहे. आधीच आजारी असलेल्या व्यक्तींचा गाडीत प्रवासादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. आशा दुर्दैवी घटना घडू नये तसेच इतर प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी आवाहन करण्यात आले आहे.प्रवाशांच्या आरोग्यासंदर्भातील धोका टाळण्यासाठी या गाडीतून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक, गर्भवती महिला, दहा वर्ष आणि त्याखालील मुले, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती यांनी आवश्यक नसल्यास प्रवास करणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आजारी लोकांनी श्रमिक रेल्वेने प्रवास करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:07 IST
परप्रांतीय लोकांना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारातून दररोज अनेक श्रमिक स्पेशल गाड्या धावत आहेत. परंतु काही आधीच विविध आजाराने त्रस्त असलेले लोक प्रवास करत असल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो.
आजारी लोकांनी श्रमिक रेल्वेने प्रवास करू नये
ठळक मुद्देमनमाड : रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन