पेठ : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी पेठ तालुक्याचे शिवसेनेचे संचालक श्यामराव भास्कर गावित यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बाजार समितीच्या सभागृहात सभापती देवीदास पिंगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत उपसभापतिपदी आवर्तन पद्धतीने श्यामराव गावित यांची बिनविरोध निवड झाली. नव्याने संचालक मंडळ गठित झाल्यानंतर गावित यांना दुसऱ्या टप्प्यात उपसभापतिपद मिळाल्याने पेठ तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी सभापती देवीदास पिंगळे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य भास्कर गावित, संचालक संपत सकाळे, पेठच्या सभापती जयश्री वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य हेमलता गावित, अंबादास चौरे, रामदास वाघेरे, तुळशिराम वाघमारे, मोहन कामडी, विलास अलबाड, जगदीश शिरसाठ, यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित उपसभापती श्यामराव गावित यांचे पेठ येथे आगमन झाल्यावर नगरपंचायत सभागृहात स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष लता सातपुते, उपनगराध्यक्ष मनोज घोंगे, पोलीस निरीक्षक विजय सोनवणे, नगरसेवक कुमार मोंढे, चेतन निखळ, प्रकाश धुळे, राजश्री शिरसाठ, सुनीता पाटील, पुंडलिक महाले, रामदास भोये, रघुनाथ चौधरी, साई ग्रुपचे विक्र म चौधरी, अंकुश निकम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(वार्ताहर)
उपसभापतिपदी श्यामराव गावित
By admin | Updated: July 1, 2016 00:25 IST