शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दंड भरूनही अडविल्या गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 01:19 IST

चार महिन्यांपूर्वी वाळूचोरीच्या संशयावरून पकडलेल्या गाड्यांचे दंड भरूनही निव्वळ जप्त वाळूच्या लिलावाच्या कारणास्तव नाशिक प्रांत अधिकाºयांनी बारा गाड्या अडवून ठेवल्याची तक्रार वाळू वाहतूकदारांनी केली असून, प्रशासन वाळूच्या प्रश्नावर बेकायदेशीर कृत्य करीत असल्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही केली जात आहे.

नाशिक : चार महिन्यांपूर्वी वाळूचोरीच्या संशयावरून पकडलेल्या गाड्यांचे दंड भरूनही निव्वळ जप्त वाळूच्या लिलावाच्या कारणास्तव नाशिक प्रांत अधिकाºयांनी बारा गाड्या अडवून ठेवल्याची तक्रार वाळू वाहतूकदारांनी केली असून, प्रशासन वाळूच्या प्रश्नावर बेकायदेशीर कृत्य करीत असल्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही केली जात आहे.  शहरातील पेठेनगर चौकात ३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिकच्या प्रांत अधिकाºयांनी वाळूच्या वाहनांंवर कारवाई केली होती. जवळपास ३२ वाहनांचे पंचनामे करून ते जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. यातील बारा गाड्यांमध्ये वाळू भरलेली होती, तर उर्वरित २० रिकाम्या गाड्यांमध्येही वाळू असल्याचा निष्कर्ष काढून तहसीलदारांनी वाळू वाहतूकदारांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली. प्रशासनाच्या या बेकायदेशीर कारवाई विरोधात वाळू वाहतूकदारांनी अपर जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल केले व कारवाई करण्यात आलेल्या वाहनांचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत फेर पंचनामे करण्याची मागणी केली. ती मान्य करण्यात येऊन त्यात वस्तुनिष्ठ अहवाल अपर जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आल्यानंतर या अपिलाची सुनावणी झाली. त्यात ज्या गाड्यांमध्ये वाळू नाही त्या सोडून देण्याचे तर ज्यांच्यामध्ये वाळू आहे, परंतु त्याबाबतचा परवाना वा पावत्या वाळू वाहतूकदार सादर करू शकले नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार वाळू वाहतूकदारांनी नाशिक तहसीलदारांकडे दंडाची रक्कम भरली आहे. अपर जिल्हाधिकाºयांनी निकाल देऊन २२ दिवसांचा कालावधी उलटला असून, नाशिक तहसील कार्यालयाने वाळू वाहतूकदारांकडून दंडाची रक्कम भरून घेत, शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर पुन्हा असे कृत्य न करण्याचा बॉण्ड (बंधपत्र) भरून घेण्यासाठी प्रकरण नाशिकच्या प्रांत अधिकाºयांकडे रवाना केले आहे. वाळू वाहतूकदारांनी बॉण्ड करून देण्याची तयारी दर्शविली असली तरी, त्यावर निर्णय घेण्यास प्रांत कार्यालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वाळू वाहतूकदारांचे म्हणणे आहे. मुळात ज्या वाळूच्या वाहतुकीवरून प्रशासनाने दंड भरून घेतला ती वाळू वाहतूकदारांना परत करणे क्रमप्राप्त असतांना प्रशासनाने दंड घेऊनही वाळूवर कब्जा सांगितला आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या वाळूचा लिलाव होत नाही, तोपर्यंत वाहतूकदारांच्या गाड्या न सोडण्याची भूमिका घेतली आहे.  गेल्या चार महिन्यांपासून सदरच्या गाड्या एकाच जागेवर उभ्या असून, प्रशासनाने जर वाळूवर मालकी दाखविली असेल तर त्यांनी ती ताब्यात घ्यावी त्यासाठी गाड्या अडविण्याची गरज नसल्याचे वाळू वाहतूकदारांचे म्हणणे आहे. परंतु निव्वळ वाळू वाहतूकदारांनी अपर जिल्हाधिकाºयांकडे अपील करून दाद मागितल्याचा राग मनात धरून प्रशासनातील अधिकारी वाळू वाहतूकदारांना अद्दल घडविण्यासाठी अडवणूक करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.व्यवसाय चौपट झालाचार महिन्यांपासून प्रशासनाने कारवाईच्या नावाखाली लाखो रुपये किमतीच्या गाड्या अडवून धरल्या असून, ऐन दिवाळी-दसरा सणाच्या तोंडावर वाळू व्यावसायिकांवर उपासमारी ओढवली आहे. वाळू वाहतुकीचा हंगामदेखील त्यामुळे संपुष्टात आल्याने आगामी काळात पोटापाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याची भावना वाहतूकदारांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाविरोधात पुरावे गोळाच्वाळू वाहतूकदारांवर कारवाई करतांना प्रशासनातील अधिकाºयांनी अनेक बेकायदेशीर व नियमबाह्ण कृत्य केल्याने त्याचे पुरावे वाळू वाहतूकदारांनी गोळा केले आहेत. त्याबाबत थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, अपर जिल्हाधिकाºयांनी दंड भरून वाळू वाहतूकदारांच्या गाड्या सोडण्याचे आदेश दिलेले असतानाही जप्त वाळूच्या लिलावाचा मुद्दा पुढे करण्याची कृती म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान असल्याचे वाळू वाहतूकदारांचे म्हणणे आहे.