प्राचार्य आर. डी. पवार यांनी प्रास्ताविकात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करून स्काऊट-गाइड चळवळीचे महत्त्व पटवून दिले. माजी सरपंच व स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्या सरला राघो अहिरे यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. ध्वजारोहण स्कूल कमिटी अध्यक्ष अरुण अहिरे यांच्या हस्ते झाले. स्काऊट-गाइडचे ध्वजारोहण स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य गोविंद सीताराम अहिरे यांनी केले.
याप्रसंगी माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप जगन्नाथ अहिरे, उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर सुदाम अहिरे, स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य विजय जिभाऊ चव्हाण, हिरूबाई साहेबराव अहिरे, भिका बाबूराव अहिरे, मोठाभाऊ वनाजी अहिरे, विश्वास नानाजी अहिरे, योगेश मन्साराम आहिरे, माजी मुख्याध्यापक साहेबराव अहिरे, विद्यालयाचे प्राचार्य आर. डी. पवार आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो- १६ ब्राह्मणगाव
ब्राह्मणगाव येथील श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल, अभिनव बालविकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण करताना स्कूल कमिटी अध्यक्ष अरुण त्र्यंबक अहिरे. समवेत माजी सरपंच व स्कूल कमिटी सदस्या सरला राघो अहिरे, प्राचार्य आर.डी.पवार आदी.
160821\16nsk_40_16082021_13.jpg
फोटो- १६ ब्राह्मणगाव श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल,अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ब्राम्हणगांव या विद्यालयात ध्वजारोहन करतांना स्कूल कमिटी अध्यक्ष अरुण त्र्यंबक अहिरे. समवेत माजी सरपंच व स्कूल कमिटी सदस्या सौ.सरला राघो अहिरे, सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य आर.डी.पवार आदि .