शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

श्रीराम, गरूड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:22 IST

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या प्रभू श्रीराम व गरुड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा आहे. सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला. बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला. या रथाच्या देखभालीची जबाबदारी पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे सोपविली.

संदीप झिरवाळ ।पंचवटी : नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या प्रभू श्रीराम व गरुड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा आहे. सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला. बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला. या रथाच्या देखभालीची जबाबदारी पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडेसोपविली. रास्ते यांनी त्यावेळी तरुण मंडळी एकत्र यावी यासाठी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना करत व्यायामप्रेमी व पहिलवान घडविले आणि नंतर हेच पहिलवान पुढे रथोत्सवात रथ ओढण्याचे काम करू लागल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आणि तेव्हापासून आजता गायत सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे श्रीराम रथाची जबाबदारी आहे. पूर्वीच्या काळी रस्ते नसल्याने खडतर मार्गानेच रथ ओढला जायचा. एकदा रथोत्सवाच्या दिवशी रथ वाघाडी नाल्यातील चिखलात फसला. त्यावेळी पाथरवट समाजाच्या काही युवा कार्यकर्त्यांनी चिखलात रूतलेला रथ सुखरूपपणे बाहेर काढल्याने तेव्हापासून रामाच्या रथाची धुरा वाहण्याचा मान समस्त पाथरवट समाजाकडे दिला आहे. श्रीराम रथाचे मानकरी हे सरदार रास्ते आखाडा तालीम संघाचे पदाधिकारी आहेत तर गरुड रथाचा मान अहल्याराम व्यायाम शाळेकडे आहे. रथोत्सवाचे मुख्य मानकरी हे बुवा असतात. यंदा पुष्करराजबुवा हे मानकरी असून, बुवा रथोत्सवाच्या मानकऱ्यांना मानाचा गंध लावून सत्कार करतात. श्रीरामाचा रथ हा पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेला आहे. पंधरवड्यापूर्वी श्रीरामाच्या रथाचे उजवे चाक बदलण्यात आले. सांगली येथील कारागिराने हे चाक बनविले तर पाथरवट समाजाच्या एका भाविकाने पुढाकार घेत रथाच्या चाकासाठी आलेल्या ७० हजार रुपये खर्चाची जबाबदारी पेलली. १७७२ पासून रथोत्सवाची परंपरा असून दरवर्षी श्रीरामन वमीनंतर  दोन दिवसांनी येणाºया कामदा एकादशीला हा रथोत्सव साजरा केला जातो. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघणाºया या रथोत्सव यात्रेत तमाम नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.बुवांचे रथाभिमुख दिशेने मार्गक्रमणरथोत्सवाच्या दिवशी रथाचे मानकरी असलेले बुवा हे दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथोत्सव मार्गावर मार्गक्रमण करत असतात. दरवर्षी पुजारी कुटुंबीयातील सदस्यांना हा मान मिळत असतो. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी मालविय चौकातून रथ राममंदिराकडे नेला जातो. पाथरवट समाजाच्या वतीने रथोत्सवाचे स्वागत म्हणून शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौक परिसरात आकर्षक कमान उभारून तसेच विद्युत रोषणाई करून गुढ्या उभारून आदल्या दिवशी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले जाते. रथोत्स वापूर्वी श्रीराम व गरुड रथांना रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाईचे काम केले जाते. श्रीराम रथापुढे गरुड रथ आकाराने लहान आहे. रथोत्सवाची तयारी पूर्ण झाल्यानंतर आदल्या दिवशी रथांची चाके, धुरी, तसेच ब्रेक तपासणी करून चाकांना वंगण लावण्याचे काम केले जाते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर