शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव महिन्याभरानंतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:41 IST

हिरावाडीतील महापालिका क्रीडा संकुललगत मनपाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बंद होता. त्यामुळे जलतरण तलावाला टाळे ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने कमी दाबाने पाणीपुरवठा केली जाणारी जोडणी बंद करून नवीन जलवाहिनीतून जोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत केल्याने बंद असलेला तलाव पुन्हा सुरू झाला आहे.

पंचवटी : हिरावाडीतील महापालिका क्रीडा संकुललगत मनपाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बंद होता. त्यामुळे जलतरण तलावाला टाळे ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने कमी दाबाने पाणीपुरवठा केली जाणारी जोडणी बंद करून नवीन जलवाहिनीतून जोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत केल्याने बंद असलेला तलाव पुन्हा सुरू झाला आहे.गेल्या महिनाभरापासून बंद असलेला जलतरण तलाव पुनश्च सुरू झाल्याने तलावात पोहण्यासाठी येणाºया परिसरातील शेकडो जलतरणपटूंनी समाधान व्यक्त केले आहे. जलतरण तलावात दैनंदिन पाणी फिल्टरेशन करण्यासाठी पाणी कमी पडत असल्याने प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती म्हणून जलतरण तलाव अनिश्चित काळासाठी बंद ठेवला होता. त्यामुळे दैनंदिन पोहण्यासाठी येणाºया शेकडो जलतरणपटूंची बोळवण होत होती. अपुºया पाणीपुरवठ्यामुळे नोव्हेंबरमध्ये जलतरण तलाव अनिश्चित काळासाठी बंद ठेवल्याचा फलक प्रवेशद्वारावर लावला होता. तलावात पाणी शुद्ध रहावे म्हणून दैनंदिन पाणी फिल्टर करावे लागते. काही दिवसांपासून तलावात कमी पाणीपुरवठा होत असल्यामुळे फिल्टरेशनला पाणी अपुरे पडत होते त्यामुळे दर दोन दिवसांनी पाणी फिल्टर करावे लागायचे. तलावात पाणी खराब राहत असल्याने जलतरणपटू तक्र ार करायचे. प्रशासनाने तलावात जास्त पाणी उपलब्ध करून नवी नळजोडणी करावी यासाठी मनपाकडे पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासन कधी बांधकाम तर कधी पाणीपुरवठ्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायचे. त्यामुळे जलतरण तलावात पोहण्यासाठी येणाºया जलतरणपटूंची गैरसोय झाली होती.याबाबत काही दिवसांपूर्वी दैनिक लोकमतमध्ये जलतरण तलाव बंद असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मनपा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन जलतरण तलावाला होणाºया जुन्या जलवाहिनीची जोडणी बंद करून नव्या जलवाहिनीतून जोडणी करत पाणीपुरवठा सुरळीत केल्याने जलतरण तलाव पुन्हा सुरू झाला आहे.जलतरण तलावाचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला त्या संबंधित ठेकेदाराचा करार संपलेला आहे. करार संपल्याने नवीन टेंडर काढण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलावातक्र ीडासंकुलाच्या लगत असलेल्या ठिकाणाहून कूपनलिकेतून पाणी वापरले जायचे, मात्र जुन्या जलवाहिनीतील जोडणी बंद करून नवीन जलवाहिनीतून नळजोडणी केल्याने पाण्याचा दाब वाढला. पंधरवड्यापासून जलतरण तलाव पुनश्च सुरू झाला आहे. आता तरण तलावात भरपूर पाणी मिळत आहे- आर. एस. पाटील, प्रभारी विभागीय अधिकारी, पंचवटी मनपा

टॅग्स :SwimmingपोहणेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका