नाशिक : पंचवटीतील पुरातन श्री काळाराम मंदिरात संपूर्ण आषाढ महिन्यात अखंड कीर्तन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील महाकवी कालिदास कीर्तन महाविद्यालयाच्या पाच महिला कीर्तनकारांची कीर्तने या उपक्रमांतर्गत दररोज रात्री ८ ते १० या वेळेत होणार असून, या कीर्तनकारांत संध्या डबीर, संगीता देशपांडे, मृण्मयी कुलकर्णी, प्रज्ञा कुलकर्णी, मृणाल जोशी यांचा समावेश आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री काळाराम कीर्तन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)