शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

श्री गणेश चित्रमाला प्रदर्शन: गणरायाच्या विविध रुपांची गणेशभक्तांना मोहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:30 IST

या चित्रप्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही चित्राकृती तर काही ताम्रपत्रावर कोरलेल्या गणरायांच्या विविध रुपे आहेत. रेषांवर विशेष प्रभुत्त्व असलेल्या वर्मा यांनी प्रामुख्याने गणरायाचा बालाजी अवतार, सरस्वती अवतार, पंचमुखी हनुमान अवतार, दत्तमुखी अवतार आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहेत.

ठळक मुद्दे बाप्पांची विविध रुपे न्याहाळण्याची संधी चित्रप्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित

नाशिक : गीतकार यशवंत देव यांनी ‘कोटि कोटि रुपे तुझी...’ या भक्तीगीतातून वर्णिल्या महिमेनुसार श्री गणरायाची नानाविध रुपे, अवतार नाशिककरांसमोर चित्राकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. गणरायाच्या विविध रुपांनी गणेशभक्तांना मोहिनी घातली आहे.निमित्त आहे, गणेशोत्सवानिमित्त चित्रकला महाविद्यालयातील प्राध्यापक दीपक वर्मा यांनी रेखाटलेल्या गणरायांच्या विविध अवतार व ताम्रपत्रावरील रुपांच्या चित्रप्रदर्शनाचे. गंगापूररोडवरील हार्मनी कलादालनात श्री गणेश चित्रमाला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. हे चित्रपद्रशर्न येत्या शुक्रवारपर्यंत (दि.२१) संध्याकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत सर्व गणेशभक्तांसाठी मोफत खुले राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. उद्घाटनाप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, वैशाली जैन, विजयन सोहोनी, अ‍ॅड. मृणालिनी खैरनार, रघुनाथराव कुलकर्णी, बाळ नगरकर आदि उपस्थित होते.या चित्रप्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही चित्राकृती तर काही ताम्रपत्रावर कोरलेल्या गणरायांच्या विविध रुपे आहेत. रेषांवर विशेष प्रभुत्त्व असलेल्या वर्मा यांनी प्रामुख्याने गणरायाचा बालाजी अवतार, सरस्वती अवतार, पंचमुखी हनुमान अवतार, दत्तमुखी अवतार आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहेत. लक्षवेधी रंगसंगती, अलंकारिक-सृजनशिल मांडणी हे या चित्रांचे वैशिष्टय आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्राकृतींमधील गणरायांच्या विविध रुपे बोलकी वाटतात.गणेशोत्सवामध्ये नाशिककरांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पांची विविध रुपे न्याहाळण्याची संधी मिळाली असून नाशिककर गणेश भक्तांनी उद्घाटनाच्या दिवशी गणरायांची चित्ररुपे न्याहाळण्यासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :artकलाNashikनाशिक