शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जास्त रिटर्न्सचे आमिष दाखवून सिडकोमध्ये पॉलिसीधारकास आठ लाखांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 18:54 IST

खाते क्रमांकावर सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांचा वेळोवेळी भरणा केला. रक्कम खात्यात जमा होताच ‘त्या’ भामट्या विमा कंपनीच्या अधिका-याने भ्रमणध्वनी बंद करून कुठलाही परतावा पानसरे यांना दिला नाही.

ठळक मुद्दे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांना गंडा नवीन पॉलिसी काढल्यास तुम्हाला जुन्या पॉलिसीच्या तुलनेत अधिक परतावा

नाशिक : सिडकोमधील चेतनानगर भागात राहणाºया एका ५८ वर्षीय नागरिकाला अज्ञात भामट्याने विमा पॉलिसीमध्ये तांत्रिक अडचणीचे कारण सांगून नव्या पॉलिसीचे जास्त परताव्याचे आमिष दाखवून सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चेतनानगरमधील सीतासदन येथे राहणा-या दत्तात्रय बाबुराव पानसरे यांना एका विमा कंपनीचे नाव सांगत अधिकारी असल्याची बतावणी करून एका भामट्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर भ्रमणध्वनीवरून पुन्हा संपर्क साधत पॉलिसीला तांत्रिक अडचण आल्याचे सांगितले. तसेच नवीन पॉलिसी काढल्यास तुम्हाला जुन्या पॉलिसीच्या तुलनेत अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून १६ आॅगस्ट ते २७ नोव्हेंबर या कालावधीदरम्यान या भामट्याने एचडीएफसी बॅँकेच्या एका खात्यावर वेळोवेळी धनादेश व आरटीजीएसद्वारे नव्या पॉलिसीची रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार पानसरे यांनी त्याने दिलेल्या खाते क्रमांकावर सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांचा वेळोवेळी भरणा केला. रक्कम खात्यात जमा होताच ‘त्या’ भामट्या विमा कंपनीच्या अधिका-याने भ्रमणध्वनी बंद करून कु ठलाही परतावा पानसरे यांना दिला नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पानसरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित विमा कंपनीच्या भामट्या अधिका-याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcidcoसिडकोnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय