नाशिक कलेची राजधानी व्हावी : रवींद्रकुमार सिंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:37 AM2018-06-21T00:37:49+5:302018-06-21T00:37:49+5:30
नाशिक हे शहर कलेची राजधानी व्हायला हवी. शहरात एकाहून एक सरस कलाकार असून, सर्व नाशिककरांना त्यांचा अभिमान वाटावा अशी गोष्ट होत आहे. या कलांचा सर्वदूर प्रसार व्हायला हवा, जास्तीत जास्त लोकांनी या कलाकारांच्या कलेचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
नाशिक : नाशिक हे शहर कलेची राजधानी व्हायला हवी. शहरात एकाहून एक सरस कलाकार असून, सर्व नाशिककरांना त्यांचा अभिमान वाटावा अशी गोष्ट होत आहे. या कलांचा सर्वदूर प्रसार व्हायला हवा, जास्तीत जास्त लोकांनी या कलाकारांच्या कलेचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
‘जनस्थान फेस्टिव्हल’ अंतर्गत ‘प्रतिबिंब’ चित्रशिल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे सकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. सिंगल पुढे म्हणाले, शब्द अपुरे पडावेत इतके सुंदर हे प्रदर्शन असून, येथील चित्रशिल्प पाहून प्रत्येकाला प्रेरणा मिळू शकते. जनस्थानच्या माध्यमातून शहरातील कलेच्या क्षेत्रात चांगले योगदान दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पराग जोशी यांनी सूत्रसंचालन केले. जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले. याप्रसंगी लोकेश शेवडे, किशोर पाठक, सदानंद जोशी, विश्वास ठाकूर, अभय ओझरकर, विनोद राठोड, विद्या करंजीकर, पल्लवी पटवर्धन आदींसह कलाकार, नागरिक उपस्थित होते. सोहळ्यांतर्गत गुरुवारी (दि. २१) जनस्थान आयकॉन पुरस्कार वितरण सोहळा परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर येथे होणार आहे. जनस्थान व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वतीने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा होत आहे. प्रदर्शनात प्रसाद पवार यांची छायाचित्रे, नंदू गवांदे यांचे अक्षरलेखन पोस्टर्स, धनंजय गोवर्धने, सावंत बंधू, अनिल माळी, सी. एल. कुलकर्णी, स्नेहल एकबोटे आदींची चित्रे तसेच श्रेयस गर्गे, संदीप लोंढे आदींची शिल्पे मांडण्यात आली होती.