शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अवघ्या ३६ रुपयांत देत होते 'रोलेट'चे आयडी-पासवर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 13:27 IST

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७०० रुपये रोख व ३ हजार रुपयांचा मोबाइल जप्त केला. त्यांच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपंचशीलनगर येथे कारवाईभारतनगर परिसरात कारवाई

नाशिक : मोबाइलवर रोलेट जुगाराचे ॲप्लिकेशन वापरुन अवघ्या ३६ रुपयांत तरुणांना आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देत रोलेटसारख्या जुगारात ढकलणाऱ्या दोघा संशयितांना मुंबईनाका व गंगापूर पोलिसांनी पकडले आहे.मुंबई नाका पोलिसांनी भारतनगर परिसरात कारवाई करून आसिफ दस्तगीर बागवान (४०) व गणेश एकनाथ डिंडे (सर्व रा. भारतनगर) या दोघांना पकडले. हे दोघेही बुधवारी (दि.३०) दुपारी भारतनगर परिसरात आढळून आले.दोघांनी त्यांच्याकडील मोबाइलवर ॲप डाऊनलोड करून तरुणांना जुगार खेळण्यासाठी ३६ रुपयांत आयडी व पासवर्ड देत असताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७०० रुपये रोख व ३ हजार रुपयांचा मोबाइल जप्त केला. त्यांच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच गंगापूर पोलिसांनी परवेझ ऊर्फ सोनू जावेद मनियार (१९, रा. शिवाजी नगर), लकी आहेर ऊर्फ भारत वसंत आहेर (रा. दिंडोरी रोड), विशाल आनंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पोलिसांनी परवेझला अटक केली आहे. संशयित ऑनलाईन पद्धतीने रोलेट खेळताना व खेळवताना आढळून आले होते. त्यांच्याकडून ३५० रुपये व १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे.रोलेट जुगार खेळणारे ताब्यातपंचशीलनगर येथे पोलिसांनी कारवाई करून रोलेट जुगार खेळवणाऱ्यास ताब्यात घेतले आहे. सिद्धांत गुलाबराव शिराळ (२४, रा. पंचशीलनगर) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.सिद्धांत शिराळ हा मोबाईलवरून रोलेट जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांना आयडी व पासवर्ड देत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी गुरुवारी (दि.१) मध्यरात्री पंचशीलनगर परिसरातून सिद्धांत यास पकडले. त्याच्याकडून ५ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्यासह मनोज बैरागीविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकCrime Newsगुन्हेगारी