लोकमत न्यूज नेटवर्कसप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर विश्वशांतीसाठी व विश्वाच्या कल्याणासाठी श्री महंत विष्णुदास महाराज यांनी शिवशक्ती महायज्ञ व श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे. या महायज्ञाला देशभरातून संत-महंत हजेरी लावत आहेत.दुपारी ४ वाजता भागवत कथा ग्रंथाचे साधू-महंतांच्या उपस्थितीत वाजत गाजत सर्व गावातून कलशासह शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सर्व रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती तसेच साधू-महंतांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून विष्णुदास महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.भागवत कथा श्रवणासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व गडावरील हजारो नागरिक गर्दी करीत आहेत. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविकही कथेचा लाभ घेताना दिसत आहे. त्याबरोबरच महाप्रसादाचाही लाभ घेत आहेत. कार्यक्रमाला प्रांरभ झाला असून, दि. १७ पर्यंत हा कार्यक्र म सुरू राहाणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक महंत विष्णुदास महाराज यांनी केले आहे.
सप्तशृंगगडावर शिवशक्ती महायज्ञास प्रारंभ
By admin | Updated: June 10, 2017 00:28 IST